देशात 28 हजार तर केरळात 20 हजार रुग्णांची भर, एकूण 338 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली,

गेल्या चार दिवसांचा विचार करता आज देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत अंशत: घट झाल्याचं दिसून येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 28 हजार 591 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली तर 338 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 34 हजार 848 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात 33 हजार 376 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 338 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

केरळमध्ये रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक

देशातील शनिवारच्या रुग्णसंख्येची तुलना करता एकट्या केरळमध्ये 20 हजार 487 रुग्णांची भर पडली आहे तर 181 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 43.55 लाख इतकी झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत 22 हजार 844 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाची सद्यस्थिती :

 कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 32 लाख 36 हजार 921

 एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 24 लाख 09 हजार 345

 सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 84 हजार 921

 एकूण मृत्यू : चार लाख 42 हजार 655

 एकूण लसीकरण : 73 कोटी 82 लाख 07 हजार 378 लसीचे डोस

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!