जन्मानंतर 31 दिवस सुरु होते कोरोनाचे उपचार, अखेर…
मुंबई,
ही गोष्ट आहे चार महिन्यांच्या वीराची…जिच्या जगण्याचा संघर्ष हा तिच्या जन्मानंतर लगेच सुरु झाला. वीराचा जगण्याचा संघर्ष हा गर्भातूनच सुरु झाला. जन्मानंतर वीरा 31 दिवस जीवन आणि मृत्यूशी झुंजत होती. मात्र वीराने जी वीरता दाखवली आहे.
चिमुकल्या वीराची जिद्द आणि डॉक्टरांच्या योग्य उपचारांनी कोरोनासारख्या गंभीर व्हायरसवर मात केली आहे. जन्मानंतरचे तब्बल 31 दिवस वीरावर कोरोनाचे उपचार सुरु होते. वीरा ही देशातील सर्वात लहान आणि सर्वात कमी वजनाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली असून तिने कोरोनावर विजय मिळवून इतिहास रचला.
खरं तर, कोरोनाच्या दुसर्या लाटेचा गंभीर फटका अनेकांना दिसला. याचदरम्यान हर्ष आणि त्याचे कुटुंबही या भयानक परिस्थितीशी झुंज देत होतं. फरीदाबादमध्ये राहणारे हर्ष आणि अंकिता लवकरच आई-बाब होणार होते. परंतु हर्षला कोरोनाची लागण झाली. सर्व खबरदारी घेतल्यानंतरही त्याची पत्नी अंकिता, जी सात महिन्यांची गर्भवती होती, तिलाही कोरोनाची लागण झाली.
कोरोनानंतर अंकिताची हालत बिघडत होती. अंकिताची अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल केलं. तिच्या 31 आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर बाळाचा जन्म सिझेरियन डिलीव्हरीने झाला. बाळ 31 आठवड्यांचं असल्याने अंकिताने प्री-मॅच्युअर डिलीव्हरीमध्ये बाळाला जन्म दिला. अंकिता पॉझिटिव्ह असल्याने, मुलाची कोविडसाठी चाचणी करणे आवश्यक होतं.
मुलीची आरटी-पीसीआर चाचणीही पॉझिटिव्ह आली. अशा परिस्थितीत केवळ 1.29 किलो वजनाच्या तिच्यावर उपचार करणं खूप आव्हानात्मक होतं. हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, मुलीला व्हेंटिलेटर सपोर्टची गरज होती आणि तिचे फुफ्फुसेही संकुचित झालं होतं. एकीकडे आई मुलाला जन्माला येताच मिठी मारते, अंकिताने सुमारे एक महिन्यानंतर आपल्या मुलीला पाहिले आणि लहान मुलाचे नाव वीरा ठेवलं.
डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, अंकिता आणि तिच्या मुलीला वाचवणं खूप कठीण होतं. प्रिमॅच्युअर बाळ होण्याबरोबरच तिचं वजनही खूप कमी होते. आणि दुसर्याच दिवशी, कोविड रिपोर्टही पॉझिटीव्ह आला. अशा परिस्थितीत आम्हाला प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक घ्यावं लागलं. अखेर वीराने कोरोनावर मात झाली.