बांगलादेशाचा संघ टि-20 विश्व कप जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरेल – शाकिब
डाका,
बांगलादेश क्रिकेट संघ टि-20 विश्व कपला जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरेल आणि आमच्याकडे विश्व कपच्या तयारीसाठी पर्याप्त वेळ आहे. तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडला मालिकेत हरविल्याने संघाचे मनोबल खूप उंचावले आहे असे मत बांगलादेश संघाचा माजी कर्णधार व दिग्गज खेळाडू शाकिब अल हसनने व्यक्त केले.
टि-20 विश्व कपमधील आपल्या पहिल्या सामन्यांच्या दोन आठवडे आधी बांगलादेशाचा क्रिकेट संघ ओमानची राजधानी मस्कटमध्ये पोहचेल. तर शाकिब आणि मुस्तफिजुर रहमान हे तेथे आधी पासूनच आयपीएलमध्ये खेळत असतील.
शाकिबने म्हटले की मला आशा आहे की आयपीएलमधून आम्हांला टि-20 विश्व कपच्या तयारीमध्ये मदत मिळेल. आम्ही अशाच खेळपट्टी आणि परिस्थितीमध्ये खेळूत जेथे विश्व कप खेळला जाणार आहे. फिज आणि मी आपल्या अनुभवाला संघा बरोबर साझा करुत जे खूप उपयोगी असेल.
शाकिबने पुढे म्हटले की या व्यतिरीक्त पूर्ण संघ विश्व कपच्या 15-16 दिवस आधी ओमानला पोहचले. यामुळे संघाला खेळपट्टी आणि परिस्थितीना समजण्यास मदत मिळेल. आम्ही जिंकण्याच्या मानसिकतेने येथे जात आहोत जे विश्व कपमधील आमच्या अभियानामध्ये खूप सहाय्यक असेल.
शाकिबने मात्र ढाकातील शेरे बांगला मैदानावरील खेळपट्टीवर परत एकदा टिका केली. येथे बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडच्या संघाला सलग हरवून दोन टि-20 मालिका जिंकल्या आहेत. शाकिबने दोनीही मालिकेत 100 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र मंदगती खेळपट्टीच्या कारणामुळे त्याचा स्ट्राइक रेट फक्त 97.54 राहिला.
न्यूझीलँड विरुध्दच्या पहिल्या सामन्याच्या समाप्तीनंतर शाकिबने म्हटले होते की ढाकातील ही खेळपट्टी फलंदाजांसाठी विश्व कपच्या तयारीसाठी बिल्कुल सहाय्यक नाही. या खेळपट्टीवर सलग नऊ सामने खेळणार्या फलंदाजाला आपले प्रदर्शन विसरावे लागेल. नाही तर ते विश्व कपमध्ये दबावासह जातील. जर कोणताही फलंदाज या खेळपट्टीवर 10 ते 15 सामने खेळला तर त्याचे करिअर समाप्त होऊ शकते. यापेक्षा याला विसरले जाणेच चांगले आहे कारण आम्हांला विश्व कपमध्ये देशासाठी खेळायचे आणि जिंकायचे आहे.
त्याने मात्र म्हटले केी सतत सामने आणि मालिका जिंकणे संघासाठी खूप चांगले आहे. कारण यामुळे संघ वाढत्या मनोबलासह टि-20 विश्व कपमध्ये उतरेल.