इमानदारीने सांगयचे तर हे सर्व पैसे आणि आयपीएलमुळे झाले – वॉन
मॅनचेस्टर
इंग्लंड आणि भारतामधील कसोटी मालिकेतील पाचवा व शेवटचा कसोटी सामना हा आयपीएलला फायदा पोहचविण्यासाठी रद्द करण्यात आला आहे. भारतीय खेळाडूंनी पीसीआर चाचणीवर विश्वास करायला पाहिजे होता असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार माइकल वॉनने व्यक्त केले
वॉनने द टेलीग-ाफसाठी लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटले की इमानदारीने सांगतो की हे सर्व पैसे आणि आयपीएलसाठी झाले आहे. कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे कारण खेळाडूना कोरोना संक्रमणाचा धोका आणि आयपीएलमध्ये खेळता येणार नाही याची भिती वाटत होती.
त्याने लिहिले की एक आठवडयानंतर आपण आयपीएल पाहूत आणि खेळाडू हसत हसत आणि आनंदी होऊन इकडून तिकडे पळत असतील. परंतु त्यांनी पीसीआर चाचणीवर विश्वास करायला पाहिजे होता. आपल्याला आता या विषाणू बाबत खूप काही माहिती आहे आणि आपण याचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आणि संभाळू शकतोत.
त्याने म्हटले की, भारत सामना खेळण्यासाठी 20 सदस्यीय संघातील 11 खेळाडूना उतारु शकत नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. जर असे खेळाडू होते जे वेगळे होऊ इच्छित होते आणि खेळू इच्छित नव्हते तर ठिक होते. हे व्यक्तीगत पसंती बाबत आहे. परंतु भारताने एकादशमधील खेळाडूना मैदानावर उतरण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजे होते. याचा अर्थ तिसरी स्ट्रिंग संघाला निवडणेही का असे ना. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये अनेक राखीव खेळाडूंसह सामने जिंकले होते.
वॉनने म्हटले की भारतीय खेळाडूनी या खेळातील आपली भूमिका निभावायला पाहिजे होती जसे की इंग्लंडला मागील वर्षी दक्षिण अफ्रिकेतील आपल्याला सामन्याला पूर्ण करायला पाहिजे होते. गुरुवारी रात्रीला भारतीय संघाची पीसीआर चाचणी सर्व नेगेटिव्ह आल्या तर माझ्यासाठी हा हिरवा झेंडा होता की सामना पुढे गेला पाहिजे. क्रिकेटच्या खेळाला या कसोटी सामन्याची जरुरी होती. मालिका शानदारपणे तयार करण्यात आली होती. नाणेफेकच्या 90 मिनिट आधी एका कसोटी सामन्याला रद्द केले जाऊ शकते हे योग्य नव्हते.
वॉनने म्हटले की जर गुरुवारी सामन्याला रद्द करण्याची घोषणा केली गेली असती तर चाहत्यांना मॅनचेस्टरचा प्रवास करण्या पासून रोखता आले असते.