अलेक्झांडर ज्वेरेवचा धुव्वा उडवत नोवाक जोकोव्हिच अंतिम फेरीत

न्यूयॉर्क,

जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच याला यूएस ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याला उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव याने चांगलेच झुंजवले. दोघातील सामना पाच सेटपर्यंत रंगला. यात जोकोव्हिचने 4-6, 6-2, 6-4, 4-6, 6-2 अशा फरकाने बाजी मारली.

नोवाक जोकोव्हिच एका खास विक्रमापासून एक पाऊल दूर आहे. तो जर ही स्पर्धा जिंकला तर एकाच वर्षात चार मोठ्या स्पर्धा जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरेल. याआधी 1969 मध्ये रोड लेवेर यांनी अशा कारनामा केला होता. त्याने यावर्षी ऑॅस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे. ग-ँडस्लॅम स्पर्धेतील जोकोव्हिचचा हा सलग 27वा विजय आहे.

यूएस ओपनचा अंतिम सामना नोवाक जोकोव्हिच आणि दुसर्‍या मानांकित डेनिल मेदवेदेव याच्यात होणार आहे. जोकोविचने मेदवेदेवचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली तर त्याचे हे विक्रमी 21वे ग-ँडस्लॅम ठरेल.

अलेक्झांडर ज्वेरेवचा पराभव केल्यानंतर नोवाक जोकोव्हिच म्हणाला की, खेळासाठी येथील वातावरण खूप चांगले आहे, यामुळे आभार मानतो. मी पुढील सामना माझ्या करियरमधील अखेरचा सामना आहे, असे समजून खेळेन.

दरम्यान, नोवाक जोकोव्हिच याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या माटेओ बेरेटिनी याचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. या सामन्यात पिछाडीनंतर जोकोव्हिचने शानदार पुनरागमन करत इटलीच्या खेळाडूचा 5-7, 6-2, 6-2, 6-3 अशा फरकाने पराभव केला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!