धोनीविरोधात बीसीसीआयकडे लेखी तक्रार
नवी दिल्ली,
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात तक्रार करण्यात आली आहे. हितसंबंधांचा संघर्ष म्हणजेच कन्फ्लिक्ट ऑॅफ इन्ट्रेस्टच्या नियमांअंतर्गत ही तक्रार करण्यात आली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीला यासंदर्भात लेखी पत्र देत तक्रार केली आहे.
धोनीची टी-टवेन्टी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक म्हणून बुधवारीच नियुक्ती करण्यात आली. मात्र आता ही नियुक्ती नियमांमध्ये अडकण्याची शक्यता व्यक्त आहे. बीसीसीआयच्या अधिकार्याने तक्रारीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या तक्रारीमध्ये काहीच तर्क नसल्याचंही या अधिकार्याने म्हटलंय.
संघाची निवड झाली असून धोनी केवळ मार्गदर्शक म्हणून संघासोबत असणार आहे. तसेच विश्वचषक स्पर्धा ही आयपीएलचा उर्वरित हंगाम संपल्यानंतर होणार आहे. त्याचप्रमाणे धोनी आयपीएलचा पुढील सिझन खेळणार आहे की नाही ते सुद्धा अद्याप स्पष्ट नाहीय, असं हा अधिकारी म्हणाला आहे. धोनीला झुकतं मात देण्यात आलं असून तो आयपीएल खेळण्याबरोबरच संघासोबत मार्गर्शक म्हणूनही जाणार असल्याने संघ निवड आणि इतर गोष्टींवर त्याचा प्रभाव असू शकतो अशी शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.
या अशापद्धतीच्या तक्रारी या एखाद्याविरोधात काहीतरी हेतून केलेल्या असतात हे आता स्पष्ट झालं आहे. नवीन नियम लागू झाल्यापासून अशा तक्रारी वाढल्यात. विश्वचषक स्पर्धा आयपीएलनंतर होणार आहे. आयपीएलनंतर प्रत्येक खेळाडू हा करारमुक्त असेल आणि पुढील पर्वाआधी लिलाव होईल त्यानंतरच संघामध्ये नवीन लोकांचा समावेश केला जाणार आहे. पुढील पर्व धोनी चेन्नई संघात असेल की नाही हे ही आता सांगात येत नाही,ङ्ग असं या अधिकार्याने म्हटले आहे.