टि-20 विश्व कप : दिर्घकाळानंतर अश्विन टि-20 संघात परतला
नवी दिल्ली
भारताचा अनुभवी ऑफ फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा सदस्य राहिला आहे परंतु मागील काही वर्षांमध्ये त्याची टि-20 संघात निवड होऊ शकली नव्हती. मात्र पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि ओमानमध्ये आयोजीत होणार्या टि-20 विश्व कपसाठी अश्विनला भारतीय संघात सामिल करण्यात आले आहे.
भारताने 17 ऑक्टोंबरला होणार्या टि-20 विश्व कपसाठी बुधवारी रात्रीला 18 सदस्यींय संघाची घोषणा केली असून यात तीन स्टँडबाई खेळाडू सामिल आहेत. अश्विनलाही या संघात जागा मिळाली आहे. भारत टि-20 विश्व कपच्या गट-2 मध्ये सामिल आहे यात चिरप्रतिस्पर्धी पाकिस्तानही सामिल आहे.
आयसीसीच्या गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीतेमध्ये दुसर्या स्थानावर असलेल्या अश्विनला इंग्लंड विरुध्द सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या चार सामन्यात संघात सामिल करण्यात आले नव्हते आणि संघाच्या निर्णयावर अनेक माजी क्रिकेटर आणि विशेषतज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. परंतु अश्विनला टि-20 विश्व कपसाठी संघात सामिल केले जाणे हे निवडकर्त्यांनी युवा जोश बरोबरच अनुभवालाही महत्व दिल्याचे दिसून येत आहे.
भारताने टि-20 विश्व कपला 2007 मध्ये जिंकले होते आणि त्यावेळे पासून भारताने आता पर्यंत या स्पर्धेतील कप जिंंकलेला नाही. अश्विन 2011 च्या विश्व कपमध्ये संघात सामिल होता आणि त्यावेळी संघाने श्रीलंकेला अंतिम सामन्यात पराभूत करुन कप जिंकला होता.
अश्विनने 12 जून 2010 ला झिम्बाब्वेच्या विरुध्द टि-20 मध्ये पदार्पण केले होते आणि त्यांने भारतासाठी आपला या आधीचा शेवटचा टि-20 सामना 9 जुलै 2017 ला वेस्टइंडिज विरुध्द खेळला होता. यानंतर अश्विन आता पर्यंत भारताच्या टि-20 संघात सामिल झालेला नव्हता. मात्र चार वर्षाच्या दिर्घकाळानंतर त्यांचे टि-20 संघात आगमन होत आहे.
अश्विन भलेही मागील चार वर्षांत आंतरराष्ट्रीयस्तरावर टि-20 सामना खेळला नसेल परंतु तो या दररम्यान सतत इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) मध्ये खेळत राहिला आहे. अश्विनने 159 आयपीएल सामन्यात 27.68 च्या सरासरीने 139 गडी बाद केले आहेत. या व्यतिरीक्त त्याने 46 टि-20 सामन्यात 22.94 च्या सरासरीने 52 गडी बाद केले आहेत.
अश्विनचा अनुभव भारताला टि-20 विश्व कपमध्ये यश मिळवून देऊ शकतो आहे. भारतीय संघ जवळपास 14 वर्षाच्या दुष्काळाला समाप्त करुन या स्पर्धेचा कप जिंकण्याच्या इराद्याने उतेरल. संघ व्यवस्थापन मात्र अश्विनचा संघासाठी किती उपयोग करुन घेतील हे मात्र विश्व कपमधील आगामी सामन्यांमध्येच दिसेल.