मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड गर्दी, वाहनांच्या मोठ्या रांगा
मुंबई
गोवा महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहे. कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी दिसत आहे. खारपाडाजवळ वाहनांचा वेग मंदावला आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. तर कासू ते आमटेम रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड खड्डे असल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी 15 ते 20 तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणाकडे जाणार्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी दिसून येत आहे.
खारपाडा जवळ वाहनांचा वेग मंदावला. रात्रीपासूनच कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी आहे. माणगाव, इंदापूर, कोलाड इथेही वाहनं संथगतीने पुढे सरकत आहेत. यामुळे चाकरमान्यांना आपल्या गावी पोहोचण्यास उशीर होतोय.वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान अवजड वाहनांना 6 दिवस या महामार्गावर बंदी आहे.