पोर्तुगीज प्रजासत्ताकमध्ये काम करण्यासाठी भारतीय नागरिकांची भर्ती करण्यासाठी भारत आणि पोर्तुगाल दरम्यानच्या कराराला मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली,

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, पोर्तुगीज प्रजासत्ताकमध्ये काम करण्यासाठी भारतीय नागरिकांची भर्ती करण्याबाबतच्या भारत आणि पोर्तुगाल दरम्यानच्या करारावर स्वाक्षरी करायला मान्यता दिली आहे.

तपशील:

सध्याचा हा करार भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील भागीदारी आणि सहकार्याच्या दृष्टीने, पोर्तुगालमध्ये भारतीय कामगार कामासाठी पाठवणे आणि पोर्तुगालने ते स्वीकारणे यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा निश्चित करेल.

अंमलबजावणी धोरण:

या कराराअंतर्गत, कराराच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन केली जाईल.

परिणाम:

विशेषत: कोविड -19 महामारीनंतर अनेक भारतीय कामगार भारतात परतल्याच्या पार्श्वभूमीवर, पोर्तुगालसोबतच्या या करारावर स्वाक्षरी केल्याने भारतीय स्थलांतरित कामगारांसाठी युरोपियन युनियनच्या सदस्य देशामध्ये नवीन कामाचे ठिकाण जोडले जाईल. हा करार कुशल भारतीय कामगार आणि व्यावसायिकांसाठी नवीन संधी प्रदान करेल. भारतीय कामगारांच्या भर्तीची पोर्तुगाल आणि भारतादरम्यान ही औपचारिक व्यवस्था असेल.

फायदे:

पोर्तुगालमध्ये काम करण्यासाठी भारतीय कामगारांना नोकरीच्या संधी वाढणार आहेत. या करारामध्ये प्रस्तावित सरकार-ते-सरकार यंत्रणा दोन्ही बाजूंच्या जास्तीत जास्त पाठिंब्यामुळे कामगारांची सुरळीत ये-जा सुनिश्चित करेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!