रिपब्लिकन सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

जालना,

रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि. 11 सप्टेंबर शनिवार रोजी 11 वा. अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृह 488 येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पश्?चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने, जिल्हा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जितेकर, जिल्हा महासचिव एक्स आर्मी चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्रआप्पा खरात आदींचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदर बैठकीमध्ये जिल्ह्यातील पक्ष बांधणी, गाव तिथे शाखा तसेच न. प., प. स., जि. प. आदी निवडणूकीसंदर्भात तसेच गायरान जमिनी तात्काळ कास्तकारांच्या नावी करण्यात यावे, अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या जमिनीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, पिक विमा वाटप करण्यात यावे, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, रमाई व पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना तीन लाख रूपये देण्यात यावे यासह विविध मुद्यावर चर्चा करून या सर्व मागण्या संदर्भात निवेदन देण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

या बैठकीस जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेच्या तालुकाध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला आघाडीच्या अध्यक्षा, कामगार आघाडी अध्यक्ष, सर्कल प्रमुख, शाखाध्यक्ष, विद्यार्थी आघाडी आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना पश्?चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहूळकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!