गुगलने डूललच्या माध्यमातून सन्मान केलेले सुपरस्टार डजे टिम बर्गलिंग कोण आहेत?

नवी दिल्ली,

गुगलचे आजचे डूडल हे जगभरातल्या संगीत प्रेमींसाठी विशेष आहे. गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून स्वीडिश डीजे सुपरस्टार, गीतकार, कलाकार आणि मानवतावादी कार्यात अग-ेसर असलेल्या टिम बर्गलिंग यांना त्यांच्या 32 व्या जन्मदिवसानिमित्त मानवंदना दिली आहे. टिम बर्गलिंग हे र्ईंळलळळ या नावाने प्रसिद्ध होते. आपल्या छोट्याशा करियरमध्ये टिम बर्गलिंग यांनी डीजेच्या वेगवेगळ्या संगीत शैलीच्या माध्यमातून पॉप संगीताला एक नवीन पद्धतीने ओळख दिली.

टिम बर्गलिंग यांचा जन्म 8 सप्टेंबर 1989 रोजी स्टॉकहोम या ठिकाणी झाला. वयाच्या 16 व्या वर्षापासूनच त्यांनी संगीतातल्या वेगवेगळ्या धून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला. 2011 साली त्यांनी र्ईंळलळळ या नावाने डान्स अ‍ॅन्थम लेव्हल्स तयार केल्या. 2016 पर्यंत टिम बर्गलिंग यांनी जवळपास 220 प्रसिद्ध धून तयार केल्या.

मानवतावादी कार्यात अग-ेसर

टिम बर्गलिंग यांनी 2012 साली अमेरिकेत ’हाऊस फॉर हंगर’ची सुरुवात केली. या माध्यमातून त्यांनी जगभरातल्या लोकांना उपाशी असलेल्यांसाठी अन्न उपलब्ध करुन देण्यासाठी प्रोत्साहित केलं.

मानसिक ताणातून टिम बर्गलिंग यांनी 2018 साली आत्महत्या केली. टिम बर्गलिंग म्हणजे र्ईंळलळळ यांनी ’वेक अप मी’ सारखी जगप्रसिद्ध धून तयार केली. आज गुगलने आपल्या डूडलवर ही धून प्रसिद्ध केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!