भुसावळ-चित्तोडगड महामार्गाचे पाल गावातून जाणारऱ्या रस्त्याची रुंदी वाढवून दहा मीटर करण्यात यावी

पाल ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

रावेर – ( तालुका प्रतिनिधी- प्रदीप महाराज )

भुसावळ चित्तोडगड या महामार्गाचे काम मागील एक वर्षापासून संथगतीने सूरु असुन हा रस्ता अतिक्रमणाचा विळख्यात असल्याने सदर तेरा मीटर रुंदीचा मंजूर असून अतिक्रमणामुळे काही ठिकाणी सात मिटर तर काही ठिकाणी पाच मिटर असा बांधन्यात येत असल्याने रस्ताच्या कामात ग्रामस्थांचा निराश असून रस्ता कमीत कमी दहा मिटर रुंदीचा तयार करण्यात यावा याबाबतचा निवेदन पाल ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे सदरचे बांधकाम सार्वजनीक बांधकाम विभाग सावदा यांच्या अंतर्गत सुरु असुन सदरचे काम गाव अंर्तगत कमी रुंदिचे असुन त्यामुळे ग्रामस्थांना भावी काळात मोठ्या प्रमाणात अडचन निर्माण होईल.

रत्यालगत जिल्हा परिषद शाळा असुन लहान मुलांचे शाळेत येण्या-जाण्याचा रस्ता आहे. त्या रस्त्या वरून येतांना व जतांना लहान मुलांचा आपघात होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर शेरीनाका फाटा ते मोरव्हाल रोड हा रुंदीकरण असुन येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्या रस्त्याला रुंद करून एकी कडून दुसरीकडे जाण्याचा मार्ग मोठा करावा व किमान १० मीटर रुंदीचा रस्ता असणे आवश्यक आहे तरी सदरील रस्ता हा ७ मीटरचा न घेता १० मीटर चा घ्यावा व गावातील मंदिरा समोरील अतिक्रमण भागात राहावयाचे वास्तव तयार करून हक्क जमवण्याचा सिद्ध करतात.

उदा. मंदिरावरती सन व गुरुपोर्णिमा कार्यक्रमाच्या वेळेला जास्त प्रमाणात भाविकांची संख्या असल्याने गर्दीचा मोहोल तयार होतो व त्यावेळेला रस्त्या लागतच्या दुकानामध्ये गर्दी असते व राहते घर हे बनणाऱ्या रस्त्यावरती येत असून ते अतिक्रमण मोकळे करावे मंदिरा समोर राष्ट्रध्वज असून तेहि अतिक्रमन मध्ये दाबण्यात येत आहे. व स्वंतत्र दिनानिमित्त तेथे गावामधील शाळेचे विद्यार्थी व गावकरी हे ध्वजावंदन करतात व त्या वेळेला येणाऱ्या वाहनांना थांबावे लागते रस्त्याची रुंदी कमी असल्याने पूर्ण रस्ता कोंडला जातो व रस्त्याची रुंदी कमी असल्याने गावकर्यांमध्ये नाराजगी वेक्त होत आहे.

दुसरे असे की जळगांव जिल्हयातील पर्यटन स्थळ म्हणून पाल गावाला प्रसिद्धी मिळालेली आहे व
परमपुज्य लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम असुन गेट समोरील जागा काही दुकानदारांनी अतिक्रमन करुन जागा बळकावली आहे. तिच जागा ध्वज वंदनाची असुन आज ध्वज वंदनास गावकऱ्याना अडचण येत आहे.
सर्व रस्त्यांची कामे ही १० मीटर रुंदी कॉन्ट्रेटीकरण व डांबरीकरण करून मिळावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली आहे.

_________________________________________________________________________________________________________________________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!