राहुल गांधी दुसर्यांच्या खाद्यांवर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत – डॉ.संबित पात्रा
नवी दिल्ली,
देशात ज्यावेळी भ-माची, खोटयाचे राजकारण होते आहे तर यामध्ये राहुल गांधीचा हात असतो आहे. आज राहुल गांधीनी शेतकरी आंदोलनाचा जुना फोटो टिवीट करुन याला वर्तमानाचा फोटो असल्याचे सांगितले आहे असा आरोप भारतीच जनता पक्ष (भाजप) चे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.संबित पात्रांनी केला.
शेतकरी आंदोलनाचा एक जुना फोटो प्रसारीत करत याला वर्तमानातील फोटो असल्याचे सांगण्यावर राहुल गांधीवर निशाना साधत भाजपने सोमवारी म्हटले की काँग-ेस नेते राहुल गांधी दुसर्याच्या खाद्यांवर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत.
राहुल गांधीनी शेतकरी आंदोलनाचा फोटो टिवीट करत लिहिले होते की कायम आहे, निडर आहे, भारताचा भाग्य विधाता. राहुल गांधीनी मात्र टिवीटमध्ये मुजफ्फरनगरमध्ये रविवारी झालेल्या शेतकरी महापंचायतचा उल्लेख केलेला नव्हता.
पत्रकार परिषदेत डॉ. पात्रांनी म्हटले की काँग-ेस पक्ष अध्यक्ष विना आहे आणि ते जमिनीवर कोणत्याही मुद्दाला उठवू पाहू शकत नाही ही गोष्ट राहुल गांधीनाही माहिती आहे. यामुळे ते खोटया फोटोच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पात्रानी राहुल गांधीवर हल्लाबोल करत म्हटले की आपल्या संघटनेला पुढे न नेणे, आपल्या संघटनेला अध्यक्षहीन ठेवणे, परिश्रम न करणे आणि दुसर्याच्या खाद्यांवर बंदूक ठेवून चालविण्याचा प्रयत्न करणे राहुल गांधीची सवय बनली आहे.
देशात सुरु असलेल्या लशीकरण अभियाना बाबत बोलताना पात्रांनी म्हटले की भारतामध्ये जगातील सर्वात गतीने आणि सर्वांत मोठे लशीकरण अभियान सुरु आहे आणि पूर्ण जग याची प्रशवंसा करत आहे. परंतु राहुल गांधी लशीकरणाच्या संदर्भात एक टिवीटही करत नाहीत.
ते म्हणाले की देशात जवळपास 68.75 कोटी लोकांना लशीचा एक डोज मिळाला आहे. इतक्या मोठया लोकसंख्येला लस मिळाल्यानंतरही राहुल गांधीचे एकही टिवीट आले नाही. मागील दोन दिवसांमध्ये एक कोटीपेक्षा अधिक लोकांना लस दिली गेली. यानंतरही खोटया फोटोच्या माध्यमातून भ-म पसरविणारे यावर मौन आहेत.