तालिबान बरोबरील चर्चेसाठी संयुक्त राष्ट्राचे मानवीय प्रमुख अफगाणिस्तानमध्ये दाखल

संयुक्त राष्ट्र,

संयुक्त राष्ट्र (यूएन) चे महासचिव अ‍ॅटोनियो गुटेरेस यांनी मानवीय प्रकरणातील अवर महासचिव मार्टिन गि-फिथ्स यांना तालिबान नेतृत्वा बरोबर चर्चा करण्यासाठी काबुलला पाठविले आहे याला यूएनच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दुजोरा दिला आहे.

यूनचे महासचिव गुटेरस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की महासचिवांच्या विनंतीवरुन मार्टिन गि-फिथ्स सध्या काबुलमध्ये आहेत. रविवारच्या आपल्या दौर्‍या दरम्यान गि-फिथ्सने मानवीय मुद्दांवर अधिकार्‍या बरोबर चर्चा करण्यासाठी काबुलमध्ये मुल्ला बरादर आणि तालिबानी नेतृत्वाची भेट घेतली.

निवेदनात म्हटले की या बैठकीमध्ये गि-फिथ्सनी लाखो लोकांना निष्पक्ष आणि स्वतंत्र मानवीय सहाय्यता आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी मानवीय समुदायाच्या कटिबध्दतेचा पुर्नोच्चार केला. 

निवेदनानुसार गि-फिथ्सने सहाय्यता प्रदान करण्यात महिलांच्या महत्वपूर्ण भूमिकेवर जोर दिला आणि सर्व पक्षांकडे त्यांच्या अधिकार, सुरक्षा आणि कल्याणाला सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.

त्यांनी सर्व नागरीक, विशेष करुन महिला आणि मुलींना आणि अल्पसंख्याकांना प्रत्येक वेळी सुरक्षीत ठेवण्याचे आवाहन केले आणि अफगाणिस्तानमधील लोकां बरोबर आपली एकजुटता व्यक्त केली.

अधिकार्‍यांनी म्हटले की मानवीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षा आणि गरजवंत लोकां पर्यंत मानवीय पोहचची हमी दिली जाईल आणि मानवीय कार्यकर्ते, पुरुष व महिला दोघांनाही आंदोलनाच्या स्वातंत्र्यांची हमी दिली जाईल. .

निवेदनात म्हटले की अधिकार्‍यांनी अफगाणिस्तानमधील लोकांना सहाय्यता उपलब्ध करण्यासाठी मानवीय समुदाया बरोबर सहयोग करण्याचे आश्वासन दिले आहे. आगामी दिवसांमध्ये अजून बैठका होण्याची आशा आहे.

पुढे म्हटले की गि-फिथ्स संयुक्त राष्ट्राकडून मानवीय संघटनांच्या प्रतिनिधीना भेटतील आणि आपला धन्यवाद देतील आणि तें देशात सक्रिय असून त्यांनी या वर्षी 80 लाख लोकांची सहाय्यता केली आहे.

वर्तमानात अफगाणिस्तानमध्ये 1.8 कोटी लोकांना जीवित राहण्यासाठी मानवीय सहाय्यताची आवश्यकता आहे. एक तितृयांशना माहितीच नाही की त्याना पुढील भोजन कोठून येणार आहे. पाच वर्षापेक्षा कमी वयोगटातील अर्ध्यापेक्षा अधिक मुलाना तीव- कुपोषणाचा धोका आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!