अतिरेकी हल्ल्याविषयी अश्रशीीं! राजधानीत सुरक्षा व्यवस्था वाढवली

दिल्ली,

राजधानी दिल्लीत मोठा अतिरेकी हल्ला होण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता राजधानी हाय अलर्टवर आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील इस्त्रायली दूतावासा अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याने आता पोलिसांनी त्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. इस्त्राइलच्या दूतावासाचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

दिल्ली पुलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी 6 सप्टेंबरला ज्यू लोक नववर्ष साजरा करतात. त्यामुळे काही कट्टरतावादी संघटना त्याठिकाणी घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसांनी खबरदारीचा इशारा म्हणून सुरक्षा वाढवली आहे. त्यामुळे आता दिल्ली पुन्हा काही अतिरेकी संघटनांच्या रडारवर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी संघटना तालिबान सत्तेत आल्यामुळे काही अतिरेकी संघटनांचे मनोबल वाढलेले आहे.

नववर्षानिमित्त एपीजे अब्दुल कलाम रोड स्थित इस्त्रायली दूतावासावर दिल्लीतील इस्त्रायली नागरिक दूतावासात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे सामुहिक पद्धतीने ज्युंना टार्गेट केले जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलीसांनी सुरक्षा वाढवली आहे. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात असून परिसर सील केला गेला आहे. याआधीही इस्त्रायली दूतावास निशाण्यावर आले होते. याआधी 29 जानेवारीला अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी कार्यालयाबाहेरील काही वाहनं जळाली होती. या हल्याची चौकशी छखअ मार्फत करण्यात आली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!