देशात 5 दिवसांनी 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद, 24 तासांत 219 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली,

देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच दररोज जवळपास 40 हजार रुग्णांची नोंद केली जात आहे. आज सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38,948 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 219 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 43,903 रुग्ण कोरोनावर मात करुन कोरोनामुक्त झाले आहेत.

यापूर्वी देशात सलग पाच दिवस 40 हजारांहून कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती. मंगळवारी 41965, बुधवारी 47092, गुरुवारी 45352, शुक्रवारी 42618, शनिवारी 42766 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

भारतातील कोरोनाची परिस्थिती

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 30 लाख 27 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 40 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 3 कोटी 21 लाख 81 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 4 हजार 874 रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत.

देशातील कोरोनाची सद्यस्थिती :

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 30 लाख 27 हजार 621

एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 21 लाख 81 हजार 995

सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : चार लाख 4 हजार 874

एकूण मृत्यू : चार लाख 40 हजार 752

एकूण लसीकरण : 68 कोटी 75 लाख 41 हजार लसीचे डोस

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!