भारताचा बुद्धिबळ ऑॅलिम्पियाडमध्ये टॉप श्रेणीच्या ग-ुप बी मध्ये समावेश

चेन्नई,

भारताला आठ सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या ऑॅनलाईन फिडे बुद्धिबळ ऑॅलिम्पियाड स्पर्धेत दुसर्‍या सत्रामध्ये, टॉप डिव्हिजनच्या बी गटात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, भारत मागील वर्षी या स्पर्धेचा संयुक्त विजेता ठरला होता.

ग-ुप बी मध्ये भारत, फ्रान्स, बेलारूस, आणि अजरबैजान यांच्यासह इतर संघाचा समावेश आहे. इतरमध्ये शेनझेन चीन, मोल्दावा, स्लोवेनिया, मिस्त्र, स्वीडन आणि हंगेरी या संघाचा समावेश आहे. चार ग-ुपमधून प्रत्येकी दोन संघ प्ले ऑॅफ फेरीसाठी पात्र ठरतील.

शेनजेन चीन, मोल्दोवा, स्लोवेनिया आणि स्वीडन हे दुसर्‍या डिव्हिडजन (ग-ुप ए) मधून टॉप डिव्हिजनसाठी पात्र ठरले आहेत. एकूण 15 संघांनी दुसर्‍या डिव्हिजनमधून टॉप डिव्हिजनमध्ये पात्रता मिळवली आहे. टॉप डिव्हिडजनमध्ये रूस, अमेरिका, चीन, भारतसह 25 संघाचा समावेश आहे.

भारतीय संघ मागील वर्षी ऑॅगस्ट महिन्यात झालेल्या ऑॅनलाईन ऑॅलिम्पियाड स्पर्धत रूस सोबत संयुक्तपणे विजेता ठरला होता.

यंदाच्या वर्षी ऑॅनलाईन ऑॅलिम्पियाडसाठी भारतीय संघात माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद, विदीत संतोष गुजराती, पी हरिकृष्णा, निहाल सरीन, आर. प्रागनानंदा, कोनेरू हम्पी, डी हरिका, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, आर. वैशाली आणि बी सविता यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!