आता पॅरिस ऑॅलिम्पिकसाठी सरळ पात्र ठरण्यावर फोकस – मनप्रीत सिंह

मुंबई,

भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकले. यानंतर भारतीय हॉकी संघावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. आता टोकियो ऑॅलिम्पिक स्पर्धा संपून काही दिवसांचा कालावधी उलटला आहे. या दरम्यान, भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह याने पॅरिस ऑॅलिम्पिकविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मनप्रीत सिंह म्हणाला की, टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक कास्य पदकाचा जल्लोष बंद करत पुढील वर्षी होणार्‍या आशियाई स्पर्धेवर फोकस केले पाहिजे. जेणेकरून या स्पर्धेच्या माध्यमातून पॅरिस ऑॅलिम्पिकसाठी सरळ पात्र ठरू शकू.

2022 ची रणणिती आखण्याची वेळ

टोकियोत 41 वर्षानंतर ऑॅलिम्पिक पदक जिंकून भारतात परतल्यानंतर भारतीय संघाचे जोरदार स्वागत झाले. भारताने जर्मनीचा 5-4 ने धुव्वा उडवत ही कामगिरी केली होती. याविषयी मनप्रीत सिंह म्हणाला की, आता 2022 साठी रणणिती आखण्याची वेळ आहे. मागील काही आठवड्यात आम्हाला लोकांचं खूप सारं प्रेम मिळालं. मला वाटतं आता शरीर आणि डोक्याला आराम देण्याची गरज आहे. आम्ही सन्मान सोहळ्याचा पूर्ण आनंद घेतला. पण आता आम्हाला 2022 मध्ये चांगल्या प्रदर्शनाबाबतीत लक्ष दिलं पाहिजे.

आशियाई स्पर्धा पुढील वर्षी 10 ते 25 सप्टेंबर या दरम्यान, चीनमध्ये होणार आहे. भारतीय संघाचे लक्ष्य यात सुवर्ण पदक जिंकून पॅरिस ऑॅलिम्पिकमध्ये थेट पात्रता मिळवण्याचे आहे.

आशियाई स्पर्धा जिंकावी लागेल

मनप्रीत सिंह पुढे म्हणाला की, मागील वेळा आम्ही चूकलो आणि आम्हाला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. आम्ही नशिबवान होतो कारण टोकियो ऑॅलिम्पिकचे पात्रता फेरीचे सामने भारतात झाले होते. परंतु यंदा या गोष्टीवर आम्ही निर्भर राहणार नाही. आशियाई स्पर्धा जिंकावी लागेल. यामुळे पॅरिस ऑॅलिम्पिक 2024 च्या तयारीला चांगला वेळ मिळू शकेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!