टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना कोरोनाची लागण

ओव्हल,

पाच कसोटी सामन्याची मालिका भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु आहे. यापैकी चौथ्या कसोटीचा आज शेवटचा दिवस असून निर्णायक दिवस आहे. या मालिकेतील तीन सामन्यात आतापर्यंत 1-1 बरोबरी झाली असल्यामुळे आजच्या सामन्यात काय निर्णय येईल? याकडे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे चौथा कसोटी सामना रंगतदार वळणावर असताना टीम इंडियाच्या एका प्रमुख सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना दहा दिवस क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन संघाला पाचव्या कसोटी सामन्यावेळी मिळणार नाही. पाचवा कसोटी सामना 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात खेळवला जाणार आहे.

रवि शास्त्री यांच्यासह भारतीय संघासोबत असलेल्या 4 जणांना आयसोलेट करण्यात आले आहे. यात गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर, भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांचा समावेश असल्यामुळे आता या सर्वांना चौथ्या कसोटीसोबतच पाचव्या कसोटीला मुकावे लागणार आहे. या सर्वांना हॉटेलमध्ये आयसोलेट करण्यात आले आहे. रवि शात्री लेटरल फ्लो चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यानंतर त्यांच्यासह 4 जणांना आयसोलेट करण्यात आले असून त्यांची आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!