पंजशीर खोर्यात तालिबानकडून अमेरिकी शस्त्रांचा वापर
नवी दिल्ली,
अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सोडून दिलेल्या शस्त्रांचा वापर तालिबान आता पंजशीर खोर्यावर ताबा मिळविण्यासाठी व शेवटचा प्रतिशोधाचा संघर्ष करण्यासाठी करत आहे अशी माहिती डेली मेलने दिली आहे.
पंजशीर खोर्यात आश्रयाला असलेले अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती व वर्तमान घोषीत राष्ट्रपती सालेहंच्या नेतृत्वाखाली लढाकू काल रात्रीला पंजशीर खोर्यात तालिबानच्या विरोधात अंतिम बचाव करत होते. पंजशीर या एकमेव राज्यावर तालिबान अजून पर्यंत कब्जा करु शकलेला नाही.
तालिबानी लढाकू मात्र अमेरिकेने देशात सोडून गेलेल्या चिलखती वाहने, मोर्टार, क्षेपणास्त्रे आणि उच्च शक्ती असलेल्या तोफांचा वापर पंजशीरमध्ये करताना दिसत आहेत.
बातमीमध्ये सांगण्यात आले की व्हिडीओमध्ये तालिबानचे बंदूकधारी हे अमेरिकी सैन्याच्या एम-4 आणि एम-16 रायफलीची ब-ाडिंग करत आणि नाईट व्हिजन गॉगल्स घातलेले दिसून आले आहे अमेरिकेच्या चिलखती वाहनांमध्ये बसून प्रवास करत आहेत. काल रात्रीला काबूल पासून 70 मैल उत्तरमध्ये असलेल्या पंजशीरवर कब्जा मिळविण्यासाठी जात असलेल्या तालिबान सैनिकांच्या एका ताफ्याचे चित्रीकरण करुन दाखविले गेले आहे. आशाही बातम्या होत्या की तालिबानी दलांनी पंजशीरची राजधानी बाजारकमध्ये प्रवेश केला होता.
एनआरएफने मागील 24 तासामध्ये 600 तालिबानी लढाकूना मारल्याचा दावा केला आहे. पंरतु तालिबानने दावा केला की ते विजयाच्या उंबरठयावर आहेत आणि बातमीमध्ये सांगण्यात आले की पंजशीर राज्यातील पाच पैकी चार जिल्हे तालिबानच्या नियंत्रणात आले आहेत.
तालिबानकडून पुढील काही दिवसांमध्येच घोषणा होण्याची आशा आहे की त्यांचा नेता मुल्ला हिंबतुल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता असेल.