काबुलमध्ये मनी एक्सचेंज बाजार परत एकदा सुरु, बँकांच्या बाहेर गर्दी
काबुल,
अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्या पासून सुरु असलेल्या संकटामध्ये सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होते परंतु आता स्थिती सुधारत असून काबुलमधील मुख्य मनी एक्सचेंज मार्केट परत एकदा सुरु झाले आहे तसेच युध्दग-स्त देशात बँकिंग संकट मात्र सुरु असल्याची माहिती एका स्थानिय सूत्रांनी दिली.
मनी एक्सचेंजचा एक डीलर नजीबुल्लाहने एका वृत्तसंस्थेला सांगितले की द अफगाणिस्तान बँक किंवा सेंट्रल बँकेने 2 सप्टेंबरला घोषणा केली की सराय शाहजादा खाजगी एक्सचेंज बाजार शनिवार पासून परत एकदा सुरु झाला आहे.
ते म्हणाले की विदेशी मुद्रा विनिमय दरांमध्ये अजूनही चढ-उतार आहे कारण दरे स्थिर नाहीत आणि दिवसा सतत बदलत राहिले आहेत.
नजीबुल्लाहने सांगितले की शनिवारी सकाळी बाजार परत एकदा सुरु झाल्यानंतर एक अमेरिकी डॉलरचा व्यवसाय 87 ते 89 अफगाणि चलनाच्या दरम्यान राहिला. तालिबानकडून अफगाण अधिग-हणाच्या दहा दिवसापूर्वी एक डॉलर 79 अफगाणि चलनाच्या बरोबरीचा होता.
याच बरोबर व्यापारी केंद्र काबुलमधील मंडावीही सुरु झाले आहे. मात्र व्यापार आणि दैनिक कामकाज चांगले राहिले नाही कारण राजधानी शहराच्या मध्य भागातील स्थिती सामान्य नाही परंतु थोडीशी गर्दी आहे. नजीबुल्लाहने सांगितले की व्यापार केंद्रात काही ग-ाहक आहेत.
त्यांनी म्हटले की देशात अजूनही बँकिंगचे खूप मोठे संकट असून शहराच्या चारही बाजूला आणि सरकारी आणि खाजगी बँकांच्या मुख्य शाखांच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. अजून पर्यंत बँकांच्या शाखा सुरु झालेल्या नाहीत. यामुळे लोक आपला पैसा काढू शकत नाहीत. केंद्रिय बँकेच्या आदेशानुसार साप्ताहिक आधारावर लोकांना फक्त 200 डॉलर किंवा 20 हजार अफगाणि चलन मिळू शकतात.
स्थानिय मीडियातील बातम्यानुसार खाजगी वेस्टर्न यूनियन आणि मनी ग-ाम दोनीही ट्राँसफर सेवा संस्थांनीही 3 सप्टेंबरला अफगाणिस्तानच्या अधिकांश 34 राज्यांमधील आपले कामकाज परत एकदा सुरु केले आहे आणि लोक आता विदेशातून पैसा प्राप्त करु शकतात.