पोलीस स्टेशन रावेर येथ गणेशोत्सव सन २०२१‍ शांतता समिती सभा संपन्न

तमासवाडी ता.रावेर प्रतिनिधी – ( राजेश रायमळे mob.- 9764742079 )

दि.. ५ सप्टेंबर २०२१ रविवार रोजी गणेशोत्सव २०२१ तसेच आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने मा.पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक मा.पोलीस अधीक्षक जळगांव यांच्या उपस्थितीत शांतता समितीची सभा संपन्न झाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,गणेशोत्सव सन २०२१ व आगामी सण ऊत्सवाच्या अनुषंगाने तसेच जातीय सलोखा व सामंजस्य वृद्धिंगत करण्यासाठी करून सामाजिक ऐकोपा सौहार्द भाव कायम टिकविण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस स्टेशन रावेर येथे मा.पोलीस उपमहानिरीक्षक पोलीस निरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक आणि मा.पोलीस अधीक्षक जळगांव यांचे प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची सभा संपन्न झाली.
सभेच्या सुरूवातीला मा.चंद्रकांत गौळी अप्पर पोलीस अधीक्षक जळगांव आपल्या प्रास्ताविकात म्हणालेत की,रावेर तालुका हा सुजलाम सुफलाम असून त्याला जळगांव जिल्ह्य़ातील ग्रीन बेल्ट म्हटले जाते.मात्र याच रावेर तालुक्याला सन १९४६ पासून ते आजतागायत जातिय दंगलीचा डाग लागलेला असून ही बाब चिंताजनक असल्याची खंत व्यक्त करून जातिय सलोखा कायम ठेवून तो डाग आपण धून काढला पाहीजे,असे मत त्यांनी व्यक्त केले.

सदर सभेत अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले,त्यात प्रामुख्याने शांतता समितीचे पद्माकर महाजन,अयुब पहिलवान,प्रल्हाद महाजन,दिलीप कांबळे,अशोक शिंदे,रावेर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील तथा रावेर नगरीचे नगराध्यक्ष दारामोहम्मद जफरमोहम्मद यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर सभे मधे गजाला तबस्सुम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मा.डाॅ.प्रवीण मुंढे पोलीस अधीक्षक जळगांव आपल्या भाषणात म्हणालेत की,छोट्या छोट्या कारणावरून जातिय दंगली घडवून आणने बरोबर नाही त्याबद्दल कोणालाच क्षमा नाही तेव्हा सौहार्द पुर्ण व्यवहार करून प्रशासनाला सहकार्य करावे व शासनाकडून प्राप्त परिपत्रकानुसारच आगामी सण ऊतसव कोविड १९ नियमांचे तंतोतंत पालन करून साधेपणात साजरे करावेत.

मा.डाॅ.बी.जी.शेखर पाटील पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक आपले विचार व्यक्त करतांना सदरक्षणाय खलनिग्रहणाय या पोलीस प्रशासनाच्या घोषवाक्या नुसार कारवाई होईल कोणाचीच हय गय करणार नाहीत. बुंदेल खंड जिंकून बाजीराव पेशवा रावेर मार्गेच मार्गस्थ झाले,तसेच बादशाह औरंगजेब सुद्धा बुरहाणपुर कडे इथूनच जात असत असे ऐतिहासिक दाखले देत रावेर तालुक्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा असल्याचे त्यांनी सांगितले.गुन्हेगारीत संगत गुण फार महत्वाचा असून टुकार लोकांची संगत कधीच करू नये पालकांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून आपल्या मुलांवर संस्कार करून त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करावी त्यांचे धेय्य निश्चित करून त्याप्रमाणे त्यांना वळण लावले पाहिजे.कायद्यासमोर सगळेच समान आहेत त्यामुळेच ईथे सज्जनाशी कधीच दुरव्यवहार होत नाही व दुर्जनांना सोडून दिले जात नाही त्यांना गिरणीतील धान्याप्रमाणे पिसून पिसून गाळले जाते.तेव्हा गुन्हेगारांवर दया होणार नाही याचे भान ठेवून रहावे तसेच सामान्य नागरिकांना उद्देशून म्हणालेत की,पोलिसातला माणुस आणि माणसातील पोलीस ओळखून प्रत्येकाने पोलिस प्रशासनाला सहकार्य करीत रहावे.

यावेळेस रावेर यावल तहसीलदार पवार साहेब,रावेर तालुक्यातील शांतता समितीचे सदस्य,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष,पत्रकार बांधव तथा विविध गावांतील पोलीस पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.कैलास नागरे यांनी केले,व आभार प्रदर्शन विवेक लावंड उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपुर भाग फैजपुर यांनी केले,तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशन रावेर येथील पोलीस कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!