जम्मू -काश्मीरमध्ये शुक्रवारची नमाज शांतीपूर्णपणे संपन्न, मोबाईल फोन सेवा सुरु
श्रीनगर,
ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फ्रेरसचे वरिष्ठ फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानीच्या निधनानंतर शुक्रवारी काश्मीर खोर्यात कायदा – व्यवस्थेची स्थिती सामान्यपणे शांतीपूर्ण राहिली. यामुळे अधिकारी आता लावण्यात आलेल्या प्रतिबंधांमध्ये चरणबध्द पध्दतीने शिथीलता देण्यावर विचार करत आहेत.
जम्मू-काश्मीरचे पोलिस प्रमुख दिलबाग सिंहनी सांगितले की शुक्रवारी विना कोणत्याही अप्रिय घटनांचे स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
काश्मीरचे महानिरीक्षक विजय कुमार यांनी म्हटले की शुक्रवारी रात्री 10 वाजे पर्यंत सर्व मोबाईल फोनवर व्हॉईस कॉल आणि इंटरनेटची सुविधा बहाल करण्यात येईल.
श्रीनगरमधील हैदरपोरा कब-स्तानामध्ये गिलानीना दफण्यात आल्यानंतर अधिकार्यांनी गुरुवारी पूर्ण खोर्यात प्रतिबंध लावला होता आणि मोबाईल टेलीफोन संचालन आणि इंटरनेट सुविधाला निलंबीत करण्यात आले होते. मात्र पोस्टपेड बीएसएनएल मोबाईल फोनवर व्हॉईस कॉलिंग उपलब्ध राहिले आणि ब-ाँडब-ॅडही समर्पित बीएसएनएल ब-ाँडब-ेंड कनेक्शनवर काम करत राहिले होते.
खोर्यात स्थानिय मशिदींमध्ये लोकांद्वारा जुमेची नमाज अदा करण्यात आली कारण अधिकार्यांनी कोठेही मोठी नमाज अदा करण्यास परवानगी दिली नाही.
श्रीनगर शहर आणि पुलवामा जिल्ह्यातील काही ठिकाणांवर दगडफेक करणारे तरुण आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्षाच्या किरकोळ घटनाच्या बातम्या समोर आल्या. परंतु अधिकार्यांनी म्हटले की कोणालाही जखम न होऊ देतात यावर तत्काळ नियंत्रण मिळविले गेले.
या दरम्यान काश्मीर विद्यापीठाने शनिवारी होणार्या सर्व परिक्षांना स्थगित करण्याची घोषणा केली आहे.