बेंगळुरुमध्ये 31 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, कॉलेज सील

बेंगळुरु

बेंगळूरुतील होरामावुमधील क्रिश्चियन नर्सिंग कॉलेजमध्ये 31 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर अधिकार्‍यांनी परिसराला सील केले आहे.

आरोग्य विभागाने शुक्रवारी सांगितले की अधिकारी शहरामध्ये संक्रमित व्यक्तींच्या प्राथमिक आणि माध्यमिकमधील संपर्काचा शोध घेण्यासाठी शक्य तो सर्व प्रयत्न करत आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 31 नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये 20 केरळचे आणि 11 पश्चिम बंगालामधून आले होते. पूर्ण परिसराला सील करण्यात आले आणि जे विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यांच्यावर एचएएल कोविड केयर सेंअरमध्ये उपचार केला जात आहे.

5 ऑगस्टला कॉलेज परत एकदा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी शहरामध्ये पोहचले होते. सुरुवातीला लक्षण दिसून आल्यानंतर विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले. कॉलेज प्रशासनाने सर्व 300 विद्यार्थ्यांची कोविड चाचणी केली आहे.

दहा विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आणि नंतर अन्य विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले. नुकतेच करण्यात आलेल्या चाचणीमध्ये 15 विद्यार्थी संक्रमीत आढळून आल्याला दुजोरा मिळाला आहे. अधिकार्‍यांनी जवळपासच्या शंभर मीटर भागासह क्रिश्चियन नर्सिंग कॉलेज परिसराला सील केले होते. या भागांची ओळख कंटेनमेंट क्लस्टर झोनच्या रुपात केली आहे. आरोग्य विभागाने कॉलेज प्रशासनाला निर्देश दिले आहेत की त्यांनी 14 दिवस विद्यार्थ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची जबाबदारी घ्यावी.  अधिकांश विद्यार्थी हे नर्सिंगच्या प्रभम वर्गात शिकत आहेत.

या आधी कोलार गोल्ड फिल्ड (केजीएफ) मधील नूरुन्निसा इंस्टीटयुट ऑफ नर्सिंगमध्ये 32 विद्यार्थीनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.

कर्नाटकचे आरोय मंत्री के.सुधाकरनी मंगळवारी म्हटले होते की कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात दुर्लक्ष केल्याने नूरुन्निसा नर्सिग इंस्टिटयुटच्या विरुध्द कारवाई केली जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!