भडगाव ता.31: एकाला किडणी चा विकार, दुसऱ्याला दम्याचा आजार तर तिसऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने अॅन्जीओप्लास्टी करावी लागली व मेंदूतील गुठळीमुळे वाचा च गेली. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाचे उपचार करणे जिकरीचे झाले. त्यात त्यांचे एचआरसीटी स्कोअर वाढलेले. अशा परीस्थीतीत भडगाव येथील लाईफ लाईन कोविड सेटंर चे डाॅ.निलेश पाटील व डाॅ.पल्लवी पाटील यांनी विना रेमडीसेवीर व औषधी न वापरता नैसर्गिक उपचार पध्दतीचा अवलंब करून या तिन्ही रूग्णांना ठणठणीत बरे केले व काल ते सुखरुप घरी गेले. यावेळी अनुभव सांगताना रूग्णांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
कोरोना बाधित दिव्यांग रूग्णांवर संपुर्ण मोफत उपचार केल्यामुळे येथील लाईफ लाईन कोविड केअर सेंटर चर्चेत आहेच. आता येथील डाॅक्टरांनी विविध व्याधी असलेल्या तिन रूग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शन व औषधांचा वापर न करता ठणठणीत बरे केल्याने आश्चर्य व कुतूहलाचा विषय ठरला आहे.
कोरोना सोबत किडणीही झाली बरी
पाचोरा येथील ७५ वर्षांचे पुनमचंद लाहोटी यांचा सीटीस्कॅन स्कोअर १५/२५ होता. तर किडणीच्या विकारामुळे क्रियाटीनीन ६.९० झाले होते. ऑक्सिजन पातळी ८६% वर आली होती. अशा स्थितीत त्याच्यांवर उपचार करणे डाॅक्टरांपुढे मोठे आव्हान होते. या रुग्णांसाठी कोरोना बरे करण्यासाठी आवश्यक इंजेक्शन्स वा औषधी दिले तर धोक्याचे ठरू शकले असते.पण डाॅ.पाटील दाम्पत्याने रुग्णांच्या सहमतीने प्रचलीत नैसर्गीक पध्दतीने उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वजनानुसार नारळ पाणी, मोसंबी ज्युस, विवीध फळांचे रस, प्राणायाम, प्रोन व्हेंटीलेशन ( पालथं झोपणे) फॅन द्वारे व्हेंटीलेशन, सकारात्मक समुपदेशन यामुळे ते कोणतेही औषध वा इन्जेंक्शन न घेता बरे झाले. विषेश म्हणजे त्यांचा किडणीचा विकार ही यामुळे बरा झाल्याचे पुनमचंद लोहाटी यांनी सांगीतले. ९ दिवसांनी क्रियाटीनीन ची पातळी ६.९० वरुन २.९० झाली. ब्लड युरीया देखील १६३ वरुन ३४ वर आला.
बालदमा असुनही कोरोनातुन वाचला जीव !
नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील लता देविदास पाटील ( वय ६५ वर्षे)यांना लहानपणापासून दम्याचा विकार जडला होता. तर सतत स्टोरॅाइड्स घेतल्याने शरीर स्थुल झालेले. अशात त्यांना डबल न्युमोनिया झाला. त्यांचा सीटीस्कॅन स्कोअर १५/२५ होता. ऑक्सिजन लेव्हल ८४% इतकी होती. या रुग्णास देखील त्यांच्या बाह्य आजारामुळे इतर इन्जेंक्शन देणे जिकरीचे होते. मात्र लाईफ लाईन कोविड सेटंरच्या डाॅक्टरांनी नैसर्गिक उपचारांच्या (थ्री स्टेप फ्लू डायट) च्या सहाय्याने विविध फळांचा रस, काढे व ओली हळद आहारात दिले.त्यामुळे त्यांना दमा असुनही त्या कोरोनातुन मुक्त झाल्या.
कोरोना तर बरा झालाच पण वाचा ही परतली.
गुढे ( ता.भडगाव) येथील रविंद्र मोरे (वय ५० वर्षे) यांना तीव्र ह्रदविकाराचा झटका आल्याने तातडीने एॅन्जोप्लास्टी करावी लागली होती. त्यात त्यांना डबल न्युमिनियाने ग्रासले. मेंदुतील गाठीच्या संभाव्य धोक्याने त्यांची वाचाही गेली. सीटीस्कॅन चा स्कोअर १८/२५ होता.त्यामुळे त्यांचे कुटुंब तर हवालदिल झालेच शिवाय त्याच्यांवर न्यूमोनिया चा की मेंदू चा उपचार करायचा असा प्रश्न निर्माण झाला. अगोदरच रुग्णाच्या रोजच्या मुठभर गोळ्यांचा वापर. अशा गंभीर परीस्थितीत हरीयाणा येथील डाॅ. विश्वरूप चौधरी यांच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक पध्दतीच्या उपचारांचा अवलंब करण्यात आला. त्यांना वजनानुसार नारळपाणी, मोसंबी रस देण्यात आला. ते कोरोनातुन मुक्त झाले अन् त्याच बरोबर त्यांची वाचाही १००% परतली.या तिन्ही रूग्णांवर डाॅ.निलेश पाटील, डाॅ.पल्लवी पाटील, डाॅ.गोविंदा पवार, नर्सिंग स्टाॅफ चे शुभम पाटील, संदिप पाटील, प्रविण पाटील,सागर माळी, राजू मोरे, बाळासाहेब मांडोळे यांनी मेहनत घेतले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डाॅ.प्रफुल्ल पाटील, रविंद्र पाटील व शाम मुसंडे यांनी समपुदेशनाच्या माध्यमातून रूग्णांशी सकारात्मक संवाद साधला व त्यांना धीर दिला.
भडगांव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॅा.पंकज जाधव यांनी ही स्वत: वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले.
प्रतिक्रीया
या तिघंही रूग्णांची वेगवेगळ्या आजारामुळे परीस्थीतीत अंत्यत गंभीर होती. त्यांना रेमडेसीवीर इन्जेंक्शन, इतर औषध देणे अवघड होते. मात्र आम्ही त्याच्यां सहमतीने नैसर्गीक उपचार पध्दतीचा अवलंब केला. त्यात आम्ही यशस्वी झालो. त्यांना विना औषध व साईड इफेक्ट्स न होता बरे करु शकलो याचे खुप मोठे समाधान आहे. आजपर्यंत १००० पेक्षा अधीक रुग्ण नैसर्गिक उपचारांनी बरे केल्याचा अनुभव कामी आला.
- डाॅ.निलेश पाटील
-डाॅ.पल्लवी पाटील
धन्यवाद 🕉