बनावट लस प्रकरण : ईडीची कोलकातामधील दहा जागांवर छापेमारी
कोलकता,
बनावट कोरोना प्रतिबंधीत लस प्रकरणात केंद्रिय प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने बुधवारी कोलकातामधील दहा ठिकाणांवर छापेमारी केली मात्र ईडीच्या अधिकार्याने छापेमारीच्या तपशिलाचा खुलासा केला नाही. परंतु त्यांनी देबंजन देबच्या अटकेनंतर ही छापेमारी केली. देबने बनावट आयएएस अधिकारी बनून बनावट लसीकरण शिबीराचे आयोजन केले होते.
ईडी कार्यालयाच्या सूत्रांनुसार अधिकार्यांनी देब आणि त्यांच्या काही सहयोगींच्या घरांवर छापा मारला. देबला कोलकाता पोलिसांनी बनावट लशीकरण रॅकेटच्या प्रकरणात अटक केली आहे.
अधिकृत सूत्रांनुसार छापेमारीचा उद्देश बनावट लशीकरण शिबीरांना चालविण्याच्या दरम्यान करण्यात आलेल्या देवाण घेवाणीच्या पघ्दतीला समजणे होते. प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग दृष्टिकोणालाही लक्षात घेतले गेले आहे आणि याचा तपास केला जात आहे.
23 जूनला देबला शहरातील पोलिसांनी कथीतपणे एक आयएएस अधिकारी बनवून आणि कोविड-19 लशीकरण शिबीराचे आयोजन करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती.
अभिनेत्री आणि तृणमुल काँग-ेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती ह्या देबद्वारा आयोजीत एका शिबीरात लस घेण्यासाठी गेल्या असता त्यांना दिसून आले की सिस्टिमच्या कामकाजामध्ये काही गडबड आहे. लस घेतल्यानंतरही कोणताही संदेश न मिळाल्याने त्यांनी कारवाई केली असता हे धोकधडीचे प्रकरण समोर आले.
अशाच प्रकारे एका शिबीरामध्ये चक्रवर्ताींना कथीतपणे बनावट लस दिल्या गेल्याच्या दोन दिवसानंतर 25 जूनला प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एका विशेष तपास पथक (एसआयटी) ची स्थापना केली होती. 28 जूनला कोलकाता पोलिसांच्या एका टिमने देबच्या निवासस्थानी छापा मारला. देबने एक आयएएस अधिकार्यांच्या रुपात आपली ओळख बनवली आणि शहरात बनावट लशीकरण शिबीरांचे आयोजन केले.
पोलिसांनी देबकडून काही तिकीटे, विविध विभागांचे बनावट कागदपत्रे, तीन डेबिट कार्ड आणि बँक पासबुक जप्त केले जे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत.