उमेश यादवची जबरदस्त कामगिरी, विक्रमाला गवसणी, ठरला सहावा भारतीय गोलंदाज
लंडन,
टीम इंडियाची चौथ्या कसोटीतील दुसर्या दिवसाची झोकात सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने दुसर्या दिवसाच्या सुरुवातीपासून इंग्लंडला दणके द्यायला सुरुवात केली. उमेशने दुसर्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतरच्या सातव्या मिनिटाला टीम इंडियाला दुसर्या दिवसातील पहिली विकेट मिळवून दिली. उमेशने नाईट वॉचमॅन असलेल्या क्रेग ओव्हरटनलाआऊट केलं. यासह उमेशने अनोखा विक्रम केला. उमेश असा कारनामा करणारा सहावा वेगवान गोलंदाज ठरला.
नक्की विक्रम काय?
इंग्लंडने दुसर्या दिवसाच्या खेळाला 3 बाद 53 धावांपासून सुरुवात केली. उमेश इंग्लंडच्या पहिल्या डावातील 19 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर उमेशने क्रेगला कर्णधार विराट कोहलीच्या हाती कॅच आऊट केलं. यासह उमेश कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून कमी डावात 150 विकेटसचा टप्पा पूर्ण करणारा सहावा वेगवान गोलंदाज ठरला. याआधी टीम इंडियाकडून 5 गोलंदाजांनी हा कारनामा केलाय.
कमी डावात 150 विकेटस घेणारे भारतीय
कपिल देव : 67
जवागल श्रीनाथ : 72
मोहम्मद शमी : 80
झहीर खान : 89
ईशांत शर्मा : 94
उमेश यादव : 95ङ