गणेश विसर्जनासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी

जालना,

गणेशोत्सव दि. 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पयर्ंत साजरा करण्यात येणार असुन दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी श्री विसर्जनाकरीता यावर्षी मोतीबाग तलाव येथे व्यवस्था करण्यात आली आहे. काही गणेश मंडळ या ठिकाणी गर्दी असल्यास घाणेवाडी तलाव येथे विसर्जना करीता जाण्याची शक्यता आहे. घाणेवाडी तलावातुन पिण्याचे पाणी जालना शहरात येत असल्याने ते श्री विर्जना करीता गेल्यास गावकरी त्यास विरोध करतात तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने दि. 19 सप्टेंबर 2021 रोजीच्या श्री विसर्जन कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात येत आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांच्याद्वारे फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये यांना प्राप्तअधिकारान्वये घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहे.

हा आदेश दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी दिवसभर व दि. 20 सप्टेंबर 2021 रोजीच्या दुपारी 12.00 वाजेपयर्ंत अंमलात राहील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!