विमल गुटख्याच्या मालावर पोलिसांची झडप…

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी

वरणगाव- परिसरातील पिंपळगाव खुर्द येथील बोदवड मार्गे पिंपळगाव येथे प्रतिबंधित असलेला विमल गुटखा आणत असताना पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेश बबन जाधव व पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश पाटील हे पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी कळवले की गाडी नंबर एम एच १९ डी आर ६४६१ एक इसम हा महाराष्ट्रात प्रती बंदी असलेला गुटख्या ची चोरटी वाहतूक करीत आहे याची शहानिशा करताच झडप घालत इसम नामे सुनील वसंत माळी राहणार वरणगाव याच्याकडे अधिक चौकशी केली असता विमल गुटखा माल हा मिळून आला असून पकडलेल्या मालाची बाजार मूल्य किंमत ३६५०० असून माल हा जप्त करण्यात आलेला आहे
विमल गुटखा विक्री करणे हे मानवी सेवनास घातक असून सुद्धा कायद्याची तमा न बाळगता स्वतःची आर्थिक फायद्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विक्री केला जातो.
वरणगाव व परिसरातील विमल गुटखा हा पान ठेले व किराणा दुकान छोटे-मोठे ढाबे या ठिकाणी कायद्याचा कुठलाही वचक नसून जणू काही पोलिसांना व अन्न प्रशासन विभागाला आव्हानच दिले आहे. हम करे सो कायदा
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरणगाव व परिसरातील काही टपरीधारक पाणठेले दुकानदारांकडून याबाबत अधिक ची माहिती जाणून घेतली असता की आपण बंदी असलेला गुटका बिनदिक्कतपणे विक्री करीत आहात तुम्हाला भीती नाही वाटत का त्यावर पान ठेले दुकानदारांकडून गमंतीशीर पणे हे उत्तर मिळाले परिसरामध्ये जर का सट्टा मटका हातभट्टी चालु शकते तर मग विमल गुटखा विक्री का नको.
आमच्यावर कार्यवाही होणे हे शक्यच नाही
आम्हाला जे होलसेलर व्यापारी माल पुरवतात ते सांभाळून घेतात
पण कुणाला ?
महिन्याचा हप्ता हा ठरलेला असतो व त्यामुळेच आम्ही कुणालाही न घाबरता विमल गुटखा माल हा विक्री करीत असतो असे काही पाण ठेले दुकानदारांकडून माहिती हि मिळालेली आहे
काय आहे कायदा कुठे आहे प्रशासन कागदोपत्री फक्त नावालाच बंदी का ?
वरणगाव पोलीस स्टेशन व अन्न प्रशासन विभाग यात मनुष्यबळाची कमतरता ही असून कारवाई करण्यास सदर होऊन अडचणीचा सामना करावा लागत आहे
परिसरातील सामाजिक संघटना पक्ष कार्यकर्त्यांनी जागृत राहत पोलीस प्रशासनाला मदत करुन अवैद्य धंदे ची माहिती पुरवावी
अवैद्य धंद्याच्या कायद्यात बदल करून कठोर शासन करुन कायद्याचा वचक हा निर्माण केला पाहिजे
वरणगाव शहरातील व परिसरातील अवैध धंद्यांना आळा बसणे गरजेचे असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कायदा करत आपला मान सन्मान हा वाढवावा.
अवैधरित्या काम करणाऱ्या लोकांना यात कुठले राजकीय पुढारी हस्तक्षेप करत असतील व त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनाही यात सह आरोपी करत गुन्हा दाखल करावा असे वरणगावातील सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे

जळगाव येथील सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अधिकारी यांनी भुसावळ तालुका व परिसरात योग्य ते मनुष्यबळ पुरवत व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीला वाचवावे या अनुषंगाने
जळगाव चे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस काय ठोस निर्णय घेतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!