प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत अन्नधान्याचे वाटप

जालना,

प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत माहे सप्टेंबर 2021 साठी नियतनाप्रमाणे पात्र लाभार्थ्यांसाठी गव्हाचे नियतन देण्यात येत आहे तहसिलदार यांनी प्रति लाभार्थी योजनेचे उपलब्ध साठ्यानुसार वितरण करावे.

जालना शहरासाठी 1 लाख 31 हजार 787 लाभार्थ्यांसाठी 3 हजार 900 क्विंटल गहु, जालना ग्रामीण 1 लाख 70 हजार 478 लाभार्थ्यांसाठी 4 हजार 473 क्विंटल गहु, जालना टी.एफ. बदनापुर 1 लाख 12 हजार 441 लाभार्थ्यांसाठी 3 हजार 266 क्विंटल गहु, भोकरदन 2 लाख 20 हजार 569 लाभार्थ्यांसाठी 6 हजार 617 क्विंटल गहु, जाफ्राबाद 1 लाख 19 हजार 120 लाभार्थ्यांसाठी 3 हजार 366 क्विंटल गहु, परतुर 1 लाख 20 हजार 43 लाभार्थ्यांसाठी 3 हजार 210 क्विंटल गहु, मंठा 1 लाख 21 हजार 931 लाभार्थ्यांसाठी 3 हजार 42 क्विंटल गहु, अंबड 1 लाख 78 हजार 284 लाभार्थ्यांसाठी 3 हजार 945 क्विंटल गहु, घनसावंगी 1 लाख 53 हजार 922 लाभार्थ्यांसाठी 4 हजार 618 क्विंटल गहु.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!