सामाजिक न्यायासाठी काम हेच ध्येय : प्रा. सत्संग मुंढे

जालना (प्रतिनिधी) ,

राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविदयालयामध्ये राष्ट्रमाता परिवाराच्या वतीने मा.प्रा.सत्संग नारायणराव मुंढे उपाध्यक्ष, भगवान शिक्षण प्रसारक मंडळ गवराई यांचा महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड झाल्याबददल दि. 2 सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके तर प्रमुख पाहुणे अर्जुन भाबड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमीनाथ खाडे यांनी केले. सत्कारमूर्ती प्रा. सत्संग मुंढे यांनी आपल्या सत्कार प्रसंगी उत्तर देत असतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. सामाजिक न्यायासाठी काम करणे आपले ध्येय असणार आहे असा मानस त्यांनी व्यक्त केला. मी सामान्य मानसांवर आणि आपणा सर्वावर प्रेम करतो. तसेच प्रेम आणि सहकार्य आपल्या कडुन असावे असे अवाहन केले. महाविदयालयाने आपणास खूप काही दिले आहे. यापुढे मा. आ. डॉ. नारायणराव मुंढे, अध्यक्ष भगवान शिक्षण प्रसारक मंडळ गेवराई यांचे विचार पुढे नेण्याचे काम करणार आहे असे मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोकशाही प्रणाली मध्ये स्वातंत्रय लढयाचा उज्वल इतिहास हा काँग्रेसला आहे. माणासाने माणुस म्हणुन काम करणे हे महत्वाचे आहे. प्रा. सत्संग मुंढे सरांनी विविध पदावर काम केले आहे त्या सर्व कामाचा गौरव आणि श्रेय हे निश्?चीतच आपणास मिळाले आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा राष्ट्रमाता परिवारातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विदयार्थी यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.लहु दरगुडे यांनी केले तर आभार श्री.संतोष्? साबळे यांनी मानले. यावेळी राष्ट्रमाता परिवारातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी सत्कारमूर्ती मा. प्रा. सत्संग मुंढे सर यांचा सत्कार केला. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!