राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाची ऑॅगस्ट महिन्यातील विक्रमी कामगिरी

नवी दिल्ली,

एनएमडीसी अर्थात राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने ऑॅगस्ट महिन्यात 3.06 दसलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन आणि 2.91 दसलक्ष टन लोह खनिजाच्या विक्रीसह विक्रमी कामगिरीची घोडदौड कायम ठेवली आहे. याआधीच्या महिन्यांप्रमाणेच या ऑॅगस्ट महिन्यात देखील कंपनीच्या सहा दशकांच्या दीर्घ इतिहासातील ऑॅगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे.

लोह खनिजाच्या ऑॅगस्ट 2020 मधील उत्पादनाशी तुलना करता उत्पादनात यावर्षी 89म वाढ नोंदली गेली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालखंडातील खनिजाच्या विक्रीच्या तुलनेत 63म वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील आकडेवारीशी तुलना करता या आर्थिक वर्षात ऑॅगस्ट 2021 पर्यंत लोह खनिजाचे उत्पादन आणि विक्री अनुक्रमे 44म आणि 45म ने वाढली आहे.

पुन्हा एकदा अपेक्षांपेक्षा अधिक उत्तम कामगिरी करून दाखविणार्‍या एनएमडीसीच्या कर्मचार्‍यांचे अभिनंदन करत महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुमित देव म्हणाले, फया आर्थिक वर्षामधील गेल्या पाच महिन्यांतील आपली कामगिरी अत्यंत उत्साहवर्धक आहे.या यशामुळे विद्यमान आर्थिक वर्षात आपण ठरविलेल्या योजना अधिक आत्मविश्वासाने पूर्ण करण्यासाठी उत्तम परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक वर्ष 2022 मधील आपली उद्दिष्ट्ये गाठण्याच्या दृष्टीने अधिक लक्ष केंद्रित करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे.ङ्ग

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!