इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप, मुंबईसह अनेक शहरात पेट्रोल शंभरीपार
नवी दिल्ली,
सरकारी तेल कंपनी घ्ध्ण्थ् ने जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनुसार आज मुंबईत पेट्रोल 107.39 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर आहे. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले जातात. पेट्रोल-डिझेलचे दर आज गुरुवारी स्थिर आहेत. बुधवारी पेट्रोल-डिझेलचे दर 15-15 पैशांनी उतरले होते. आज पुन्हा एकदा कोणताही बदल यामध्ये झालेला नाही. परिणामी पेट्रोल-डिझेलचे दर अद्यापही सामान्यांना न परवडणारेच आहेत. देशभरातील 19 राज्यात पेट्रोलचे दर अजूनही शंभरीपार आहेत. याचा परिणाम जीवनावश्यक गोष्टींच्या ट्रान्सपोर्टवर देखील होत असून त्यामुळे या गोष्टींमध्ये देखील दरवाढ होत आहे. ही दरवाढ सामान्यांच्या खिशाला चाप देणारी ठरत आहे.
काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर?
-दिल्ली पेट्रोल 101.34 रुपये आणि डिझेल 88.77 रुपये प्रति लीटर
– मुंबई पेट्रोल 107.39 रुपये आणि डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर
– चेन्नई पेट्रोल 99.08 रुपये आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लीटर
– कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर
– नोएडा पेट्रोल 98.65 रुपये आणि डिझेल 89.34 रुपये प्रति लीटर
– जयपूर पेट्रोल 108.27 रुपये आणि डिझेल 97.91 रुपये प्रति लीटर
– भोपाळ पेट्रोल 109.77 रुपये आणि डिझेल 97.57 रुपये प्रति लीटर