अफगाणिस्तानच्या भारताच्या दौर्‍यासाठी तालिबानचा हिरवा कंदील

काबूल,

ऑॅस्ट्रेलिया नाही तर भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठीही अफगाणिस्तानचा संघ भारतात येऊ शकतो. या दौर्‍यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे.

तालिबान सरकारचा क्रिकेट खेळण्याचा पाठिंबा आहे. त्यामुळेच नियोजित वेळापत्रकानुसार आमच्या संघाचे सर्व दौरे पार पडणार आहेत. तालिबान संस्कृतिक विभागाच्या प्रवक्त्यांनी ऑॅस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यासाठी समर्थन देत असल्याचं आम्हाला कळवलं आहे. तसेच त्यांनी 2022 च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठीही त्यांनी परवानगी दिलीय, असे अफगाणिस्तान क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमिद शिनवारी यांनी सांगितले.

तालिबान सरकारचा क्रिकेट खेळण्याचा पाठिंबा आहे. त्यामुळेच नियोजित वेळापत्रकानुसार आमच्या संघाचे सर्व दौरे पार पडणार आहेत. तालिबान संस्कृतिक विभागाच्या प्रवक्त्यांनी ऑॅस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यासाठी समर्थन देत असल्याचं आम्हाला कळवलं आहे. तसेच त्यांनी 2022 मधील पहिल्या तिमाहीमध्ये भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठीही त्यांनी परवानगी दिलीय, असे अफगाणिस्तान क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमिद शिनवारी यांनी सांगितले.

अफगाणिस्तानचा संघ ऑॅस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामना होबार्टमध्ये 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान खेळणार आहे. हा सामना खरं तर मागील वर्षी म्हणजेच 2020 रोजी खेळवला जाणार होता. मात्र करोना आणि त्यामुळे असणार्‍या प्रवास निर्बंधांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. ऑॅस्ट्रेलिया दौर्‍याआधी अफगाणिस्तानचा संघ युएईमध्ये होणार्‍या टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसेल. 17 ऑॅक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. मात्र अफगाणिस्तान क्रिकेट संघाची पाकिस्तानबरोबरची एकदिवसीय क्रिकेट मालिका पुढील वर्षी खेळवण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे हमिद यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!