काळ्या फिती लावून टीम इंडिया मैदानात, प्रशिक्षक वासुदेव परांजपेंना वाहिली श्रद्धांजली

ओवल,

भारतीय संघाने इंग्लंडविरोधात ओवलमध्ये खेळवण्यात येत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी काळ्या फितीसह मैदानात उतरत, प्रसिद्ध दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक वासुदेव परांजपे यांना श्रद्धांजली वाहिली. बीसीसीआयने भारतीय संघाचा फोटो शेअर केला आहे. यात खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधलेले पाहायला मिळत आहेत.

बीसीसीआयने भारतीय संघाचा फोटो टिवट करताना म्हटलं की, वासुदेव परांजपे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. भारतीय संघाच्या या निर्णयावर वासुदेव परांजपे यांचा मुलगा जतिन परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी टिवट करत म्हटलं की, परांजपे परिवार तुमच्या या भावनेने प्रभावित झालं आहे.

दरमयान, वासुदेव परांजपे यांनी मुंबई आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केलं. त्यांनी 29 प्रथम श्रेणी सामने खेळली. यात त्याच्या नावे 785 धावा आहेत. पण ते प्रशिक्षक म्हणून खूप प्रसिद्ध होते. त्यांचे मुंबईतील माटुंगा येथे सोमवारी (30 ऑॅगस्ट) निधन झालं. ते 82 वर्षांचे होते.

वासुदेव परांजपे यांच्या निधनावर सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर यांच्यासह सर्वस्तरातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

लंचपर्यंत भारताच्या 3 बाद 54 धावा

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना ओवलच्या मैदानात रंगला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाने उपहारापर्यंत 3 बाद 54 धावा केल्या आहेत. विराट कोहली 18 तर जडेजा 2 धावांवर नाबाद आहे. ख्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!