धरती वाचविण्यासाठी वनसंपदा संवर्धन गरजेचे : संजय देशपांडे
जालना,
मानवाने प्रगतीचे टप्पे गाठत असताना पर्यावरणाचा बेसुमार र्हास केला. परिणामी दिवसेंदिवस होत असलेली तापमान वाढ, हुलकावणी देत असलेला पाऊस,अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल साधत धरती वाचविण्यासाठी वनसंपदा संर्वधन करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय देशपांडे यांनी आज येथे बोलताना केले.
रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन तर्फे गुरूवारी ( ता. 02) मियामाकी प्रकल्पांतर्गत जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी संजय देशपांडे बोलत होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले, वकील संघाच्या सचिव शारजा शेख,रोटरी च्या उपप्रांतपाल रो. डॉ. सुमित्रा गादीया, न्या. ए. एस. राजंदेकर,न्या. ए. एल. टिकले , न्या.एन .आर.प्रधान, न्या. व्ही.जी .सूर्यवंशी, न्या.एस.डी.भगत ,न्या. एन .व्ही.विरेश्वर, न्या. एस.एस.पल्लोड, न्या. एस. जी देशमुख,न्या.माधुरी कुलकर्णी , न्या. एच .ए.अन्सारी , न्या.एम .वाय.डोईफोडे , न्या.एस.टी.चिकणे, न्या. कांचन झंवर,न्या.एम. बी. ओझा, न्या. एस. व्ही.चक्कर, न्या.एन .ए.वानखेडे, न्या.आर. एस .अडकिने, रोटरी मिडटाउन चे अध्यक्ष रो. महेश धन्नावत, सचिव रो. प्रशांत बागडी यांची उपस्थिती होती.
संजय देशपांडे यांनी रोटरी मिडटाउन ने पर्यावरण संवर्धनासाठी सुरू केलेल्या मियामाकी प्रकल्पास न्यायालय परिसरात केलेल्या वृक्षांची वकील संघामार्फत निगा राखली जाईल. असे सांगितले.
प्रमुख जिल्हा व सञ न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी वृक्षारोपणा सारखे जीवनदायी उपक्रम राबवले पाहिजे. असे नमूद केले. सुञसंचालन अरविंद मुरमे यांनी केले तर सचिव रो .प्रशांत बागडी यांनी आभार मानले. कार्यक्रमास
वकील संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, सहसचिव जगदीश मदन, अश्विनी धन्नावत, आनंद झा, लक्ष्मण उढाण, सुरेश कुलकर्णी, अमोल मोकळे, प्रतापसिंह परिहार, रोहीत बनवसकर, निवृती मदन, यांच्या सह विधीज्ञ, कर्मचारी उपस्थित होते.
चौकट…!
पंचवीस हजार वृक्ष लागवड करणार : रो. महेश धन्नावत
कोवीड च्या दुसर्या लाटेत नैसर्गिक प्राणवायूचे महत्त्व कळून चुकले आहे. रोटरी मिडटाउन ने वृक्ष लागवड व जतनासाठी पुढाकार घेतला असून मियामाकी प्रकल्पा अंतर्गत रोटरी क्लब ऑफ मुंबई एलिमेंट च्या निलीमा झुनझुनवाला यांच्या सहकार्याने पंचवीस हजार वृक्ष लागवड केली जाईल. अशी माहिती रोटरी मिडटाउन चे अध्यक्ष रो. महेश धन्नावत यांनी यावेळी बोलताना दिली.