‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ विरोधात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांसह सहा तालुक्यातील प्रशासनाला निवेदने !

जागतिक स्तरावर हिंदू द्वेष पसरवण्याचे मोठे षड्यंत्र;

यावल -दि.2 तालुका प्रतिनिधी ( सुरेश पाटील )

‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन जागतिक स्तरावर करण्यात आले आहे.या विरोधात जगभरातून प्रतिक्रिया येत असून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे.हिंदु जनजागृती समितीसह देशभरातील32हून अधिक हिंदुत्वनिष्ट संघटना आणि हिंदु धर्माभिमानी यांचा आंदोलनात सहभाग होता.याविषयी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच यावल,भुसावळ,पारोळा, धरणगाव आणि एरंडोल तहसील कार्यालयांत आणि फैजपुर प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. आंदोलनात हिंदुराष्ट्र सेना,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल आणि गोरक्षा सेना यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सहभाग होता. जळगावमधील प्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ सुशील अत्रे आणि उद्योजक उमेश सोनार यांनी त्यांच्या बाईट द्वारे या हिंदूविरोधी परिषदेचा निषेध केला.

या कार्यक्रमाला भारतातून कम्युनिस्ट आणि साम्यवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते कविता कृष्णन,आनंद पटवर्धन,नलिनी सुंदर,नेहा दीक्षित,मीना कंदासामी आदी वक्ते संबोधित करणार असल्याचे,तसेच जगभरातील40 हून अधिक विद्यापिठेही सहभागी असल्याचा दावा आयोजकांनी केला होता;मात्र जगभरातील हिंदूंच्या जोरदार विरोधामुळे यातील अनेक विद्यापिठांनी ‘आमचा या कार्यक्रमाशी संबंध नाही’,असे घोषित करून या कार्यक्रमातून माघार घेतली आहे. जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे हे मोठे षड्यंत्र पहाता,या कार्यक्रमाला भारत सरकारने विरोध करावा,तसेच कार्यक्रमात सहभागी भारतीय वक्त्यांवर कारवाई करावी,या मागणीसाठी जगभरातील हिंदूंनी आंदोलन केले.या विश्‍वव्यापी आंदोलनात13देशांतील,23 राज्यांतील आणि400गावांतील हिंदूंनी सहभाग घेतला.तसेच या आंदोलनाचा भाग म्हणून44 ठिकाणी प्रत्यक्ष,तर206 ठिकाणांहून केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री श्री.जयशंकर यांना‘ऑनलाइन’ निवेदने पाठवण्यात आली.

‘हिंदुविरोधी प्रचाराचे वैश्‍विक षड्यंत्र’ या विषयावर ‘ऑनलाइन’ विशेष संवाद !
हिंदु जनजागृती समितीने या कार्यक्रमाद्वारे होत असलेले षड्यंत्र उघड करण्यासाठी ‘हिंदुविरोधी प्रचाराचे वैश्‍विक षड्यंत्र’या विषयावरील ‘ऑनलाईन’विशेष संवाद आयोजित केला होता.या मध्ये इंग्लंड येथील हिंदु तत्त्वज्ञ आणि भारतीय संस्कृतीचे अध्यापक पंडित सतिश शर्मा म्हणाले की, पूर्वी ज्या ख्रिस्ती आणि कम्युनिस्ट यांनी जगभरात मोठ्या प्रमाणात नरसंहार केला.त्यांना आता भय वाटू लागले आहे की,आपला खरा इतिहास आता समोर येत आहे. युरोप आणि अमेरिकेत लोक आता योग,आयुर्वेद यांचे आचरण करत असून ते हिंदु संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत.म्हणूनच ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’या हिंदुविरोधी परिषदेमधून हिंदु धर्माला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे.त्यासाठीच अमेरिकेतील 9/11हा दु:खाचा आणि आतंकवादाला विरोध असणारा दिवस त्यांनी परिषदेसाठी जाणीवपूर्वक निवडला आहे.या कालावधीत हिंदुविरोधी परिषद घेऊन त्यांना आतंकवाद आणि हिंदु धर्माला एकत्र जोडून जगभरात हिंदूद्वेष पसरवायचा आहे.हा त्यांचा अनेक वर्षांचा धंदा आहे.हिंदूंनी संघटित विरोध केल्यास ते यशस्वी होणार नाहीत आणि त्यांचा अनेक वर्षांचा धंदा संपेल.

प्रसिद्ध लेखिका आणि ‘मानुषी’ मासिकाच्या संस्थापक-संपादक प्रा.मधु पूर्णिमा किश्‍वर या वेळी म्हणाल्या की,भारताची उच्चतम पुरातन ज्ञानपरंपरा आणि त्या तुलनेत आपण मागे आहोत,असा पाश्‍चात्त्यांना पूर्वीपासूनच न्यूननंड होता.त्यामुळे त्यांच्याकडून हिंदूंविरोधात घृणा पसरवली जात आहे.एकाला‘गजवा-ए-हिंद’,तर दुसर्‍याला‘रोम राज्य’आणायचे आहे, हे आता लपून राहिलेले नाही.हिंदु धर्माला बदनाम करण्याच्या प्रयत्नाला विरोध केला पाहिजे.सिडनी(ऑस्टे्रलिया) येथील विचारवंत डॉ.यदु सिंग म्हणाले की, हिंदु, हिंदु धर्म आणि हिंदुत्व हे काही वेगळे नसून एकच आहे;मात्र त्याची विभागणी करून हिंदुविरोधक हिंदुत्वाच्या नावाखाली संपूर्ण हिंदु धर्माला लक्ष्य करत आहेत.अमेरिकेतील परिषदेचे आयोजक हे हिंदु धर्माचा द्वेष करणारे असून अमेरिका आणि कॅनडा येथील विद्यापिठे याला पैसा पुरवत आहेत.हिंदूंनी आता खंबीर होऊन संघटीतपणे त्यांना वैचारिक स्तरावर विरोध करायला हवा.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारूदत्त पिंगळे या वेळी म्हणाले की,वैश्‍विक स्तरावर आता हिंदूंनी संघटित झाले पाहिजे,तसेच भारत सरकारनेही आपल्या राजकीय शक्तीचा उपयोग करून हिंदुविरोधी कार्यक्रम रहित होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस म्हणाले की, वैश्‍विक शक्ती हे जाणून आहेत की आचरण आणि तत्त्वज्ञान या आधारावर ‘हिंदुत्वा’ला आपण कधीच पराजित करू शकणार नाही.त्यामुळे हिंदुत्वाला आतंकवादी,जातीयवादी,लैगिंक अत्याचारी वगैरे दाखवून कलंकित करण्याची जी खोटी योजना आखली आहे,ती म्हणजे अमेरिकेत होणारी हिंदुविरोधी परिषद होय !

‘ट्वीटर’वरही ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या कार्यक्रमाला जोरदार विरोध !
या ‘विशेष संवादा’पूर्वी ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाला ‘ट्वीटर ट्रेंड’वरही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचे दिसून आले.या वेळी अमेरिका,इंग्लंड,जर्मनी,नेदरलँड, कॅनडा,ऑस्टे्रलिया,कतार, इंडोनेशिया,मलेशिया,जपान, श्रीलंका,बांगलादेश,नेपाळ आदी देशांतील हिंदूंनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला.या वेळी #DGH_Panelists_Hindu_Haters या ‘हॅशटॅग’चा वापर करून 81हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले.परिणामी ‘ट्विटर’वर हा हॅशटॅग प्रथम स्थानावर होता.या हिंदुविरोधी कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने Hindujagruti.org या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन पिटीशन’ ठेवण्यात आली आहे, याद्वारे 2750 हून अधिक लोकांनी इ-मेलच्या माध्यमातून सहभाग घेतला.ही पिटीशन http://HinduJagruti.org/protest-dgh या लिंकवर उपलब्ध असून अधिकाधिक हिंदूंनी यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही समितीने केले असल्याचे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात हिंदु जनजागृती समिती,जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी नमूद केले आहे.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण यावल तालुक्यातील बातमी 9822485311 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
सुरेश पाटील
यावल तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9822485311

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!