वडीलांच्या जीवनावर आधारित ‘संघर्ष’ पुस्तकाचे प्रकाशन वडीलांच्या निधनामुळे दशक्रिया विधीवेळी पुस्तक प्रकाशित

पोलादपूर,

तालुक्यातील चरई येथील मूळचे रहिवासी असलेल्या अशोक महामुनी यांच्या जीवनातील संघर्षावर आधारित त्यांची कन्या सौ.शीतल महेश माने यांनी लिहिलेल्या ‘संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांना वडीलांच्याहस्ते नजिकच्या काळात पुणे येथे करायचे होते. मात्र, अचानक अल्पशा आजाराने पोलादपूर येथे त्यांचे निधन झाल्याने वडीलांच्या दशक्रिया विधीवेळी आप्तस्वकियांच्या उपस्थितीमध्ये पुस्तकाचे प्रकाशन करण्याची दुर्दैवी वेळ सौ.शीतल माने यांच्यावर आली. या ‘संघर्ष’ पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांच्याहस्ते करण्यात आले.

पुणे येथील पिंपळे सौदागर येथे वास्तव्य असलेल्या शीतल महेश माने यांचे वडील अशोक महामुनी आणि आई सीमा महामुनी यांच्या जीवनातील संघर्षमय वाटचालीवर आधारित कथानक ‘संघर्ष’ त्यांनी इरा ब्लॉग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे नामांकन मिळाले आहे. या पुस्तकाचे शाश्वत प्रकाशन मार्फत छपाईसह अन्य सोपस्कार पुर्ण करण्यात आल्यानंतर सौ.शीतल माने यांना या पुस्तकाचे प्रकाशन कथानायक असलेले वडील अशोक महामुनी यांच्याचहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे, असे मनोमन वाटत होते. अशातच, कोविड-19चे निर्बंध आल्याने नियोजित कार्यक्रम काही काळासाठी लांबणीवर पडला. याचदरम्यान, दि. 23 ऑगस्टरोजी मध्यरात्री अशोक महामुनी यांचे अल्पशा आजाराने पोलादपूर येथे निधन झाले.

यामुळे दशक्रियाविधीवेळी दि. 1 सप्टेंबररोजी ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये या पुस्तकाचे प्रकाशन आप्तस्वकियांच्या तसेच समाजबांधवांच्या उपस्थितीत स्व.अशोक महामुनी यांचे भाचे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांच्याहस्ते ्करण्यात आले. याप्रसंगी लेखिका शीतल माने, महेश माने, पोलादपूरचे स्विकृत नगरसेवक राजन पाटणकर, अशोक महामुनी यांच्या पत्नी श्रीमती सीमा महामुनी, पुत्र संदीप महामुनी व  अभिजित महामुनी, कन्या सौ.आरती येवले, यांच्यासह स्नुषा सौ.अस्मिता व सौ.समिधा यांच्यासह आप्तपरिवार उपस्थित होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!