कोल इंडियामध्ये 588 पदांसांठी भरती; अतिंम तारखेपूर्वी असा करा अर्ज

मुंबई

इंजिनिअरिंगची पदवी घेतला असाल आणि जर नोकरीच्या शोधात असाल तर इकडे लक्ष द्या. कोल इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (श्ऊ) या पदासाठी भरती सध्या सुरु आहे. कंपनीकडून 588 (श्ऊ) पदांची भरती होणार असून त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली आहे. मात्र आता या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2021 आहे. या पदासाठी अर्ज करताना उमेदवार उअऊए परीक्षा पात्र असणं अनिवार्य आहे.

रिक्त पदासाठीच्या जागा

कोल इंडियाने नुकतंच 588 जागांसाठी जाहीरात जारी केली आहे. यामध्ये मायनिंग इंजिनियरिंगच्या 253, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगच्या 117, मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या 134, सिव्हिल इंजिनियरिंगच्या 57, इंडस्ट्री इंजिनियरिंगच्या 15 आणि जिओलॉजीच्या 15 पदांचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा

गेल्य महिन्यात, 10 ऑॅगस्ट पासून ऑॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अभियांत्रिकी ( इंजिनिअरिंग) ची पदवी घेतलेल्या उमेदवारांची अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2021 आहे.सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क 9 सप्टेंबरपर्यंत जमा करावे लागेल. त्यानंतर लवकरच कोल इंडिया भरती परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे 60 टक्के गुणांसह भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी असणे आवश्यक आहे. इतर काही पदांसाठीच्या भरतीसाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रात एमएससी किंवा एमटेक पदवी असणे बंधनकारक आहे. शिवाय अर्जदाराचे कमाल 30 वर्षे पूर्ण असले पाहिजे.

अर्ज शुल्क किती?

सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी हा अर्ज विनामूल्य असेल. शिवाय हा अर्ज आपण ऑॅनलाईन किंवा ऑॅफलाइन दोन्ही पध्दतीत सादर करू शकतो.

1. सर्वप्रथम मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट ुुु.लेरश्रळपवळर.ळप ला भेट द्यावी लागेल.

2. त्यानंतर उरीशशी ुळींह उखङ वर क्लिक करा.

3. नंतर कोल इंडियामधील जॉब्स पर्यायावर क्लिक करा.

4. त्यासाठी लागणारी संबंधित कागदपत्रे अपलोड करा.

5. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट स्वत: जवळ ठेवा.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!