तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव -दि. 2 –

आज 2 सप्टेंबर रोजी हतनुर धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणात पाण्याचा येवा वाढत असून धरणांमधून तापी नदीपात्रात पाणी सोडावे लागणार आहे.

तरी तापी नदी काठावरील गावातील सर्व नागरिकांनी व सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे.

नदीच्या काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगांव यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!