आयएनएस तबरचा मोरोक्कन नौदलाबरोबर सराव
मुंबई,
परदेशातील तैनातीचा भाग म्हणून आयएनएस तबर 25 आणि 26 ऑॅगस्ट 21 रोजी मोरोक्कोच्या कॅसाब्लांका येथे थांबली होती (पोर्ट कॉल ).
26 ऑॅगस्ट 21 रोजी बंदर सोडल्यानंतर, जहाजाने कॅसाब्लांका बंदराजवळ रॉयल मोरक्कन नौदलाचे जहाज ’लेफ्टनंट कर्नल अर्रहमान’ बरोबर सागरी भागीदारी सरावात भाग घेतला. या सरावादरम्यान संपर्क कौशल्य, समुद्री प्रक्रियेत भरणा प्रक्रिया आणि नौदल डावपेच सारखे उपक्रम हाती घेण्यात आले होते. परस्परांना निरोप देण्यासाठी दोन जहाजांदरम्यान पारंपारिक ’स्टीम पास्ट’ ने सरावाची सांगता झाली.