कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणार्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी तक्रार समिती गठीत करणेसाठी प्रस्ताव सादर करा
जालना,
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासुन संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण ) अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणार्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समिती कार्यरत असते. जिल्हाधिकारी यांच्या सहाय्याने जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदांसाठी खालील प्रमाणे अनुभव असलेल्या व्यक्तींकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
अध्यक्ष- सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असलेली आणि महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेली महिला
दोन सदस्य- महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या अशा अशासकीय संघटना,संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती त्यांच्यापैकी किमान एक सदस्य महिला असावी.
कायदयाची पार्श्वभुमी असलेल्या व्यक्तीं. तसेच अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला.
वरीलप्रमाणे आवश्यक अनुभव प्रमाणपत्र, वैयक्तीक परिचय पत्र, पोलिस अधिक्षक यांचे चारिर्त्य प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांसह अध्यक्ष व सदस्यांसाठी परिपुर्ण प्रस्ताव दिनांक 9 सप्टेंबर 2021 पयर्ंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय ईमारत , तळ मजला जालना येथे सादर करण्याचे आवाहन सदस्य सचिव तथा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.