आशीष रसाळ: लाभार्थी युवकांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्या बँकांना टाळे ठोकणार
जालना,
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करण्यास राष्ट्रीय कृत बँकांकडून टाळाटाळ केली जात असून प्रशासनाने कर्ज पुरवठ्या बाबत बँक व्यवस्थापनांना सक्त ताकीद द्यावी, नसता मराठा महासंघातर्फे टाळाटाळ करणार्या बँकांना टाळे ठोकण्यात येतील. असा इशारा मराठा महासंघाचे शुभम टेकाळे पाटील यांनी दिला आहे.
या संदर्भात विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम टेकाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंगळवारी ( ता.31) निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेऊन दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,
मराठा समाजातील युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेऊन अनेक तरुण व्यवसाय करत आहेत.
तथापि राष्ट्रीय कृत बँकांमध्ये गेल्यानंतर टार्गेट आले नाही, आम्ही महामंडळाच्या फाईल करत नाही. असे सांगून बँक व्यवस्थापनां कडून टाळाटाळ सुरू आहे. असे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले.
जमीनदार व गहाणखत महामंडळ देत असतानाही राष्ट्रीय कृत बँकांचे शाखा व्यवस्थापक जामीनदार व गहाण खताची मागणी करून तरूणांना हुसकावून लावतात. तरी जिल्हा प्रशासनाने या कडे लक्ष देऊन कर्ज प्रकरणांबाबत निर्देशीत करावे . नसता अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय कृत बँकांना टाळे ठोकण्यात येतील. असा इशारा लेखी निवेदनात देण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शुभम टेकाळे पाटील, आकाश जगताप, पृथ्वीराज भुतेकर, अवनिश गरड यांच्या स्वाक्षर्या आहेत.