जी चौकशी करायची ती करा, मात्र जिल्ह्यातील भाजपच्या लँडमाफियांची चौकशी कधी? – भावना गवळी
वाशिम,
माझी जी चौकशी करायची ती करावी. परंतु, त्याचबरोबर 500 कोटींचा घोटाळा करणार्या लँड माफिया आमदार राजेंद्र पाटणीचीही ईडीमार्फत चौकशी लावणार का? असा प्रश्न शिवसेना खासदार भावना गवळी यांनी उपस्थित केला आहे. त्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर वाशिम येथे पत्रकारांशी बोलत होत्या.
’त्या प्रकरणाचीही ईडीमार्फत चौकशी करावी’
नगरविकास मंत्रालयाने खासदार गवळी यांची मागणी आणि शिवसेनेचे वाशीम तालुका प्रमुख रामदास मते यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत सदर चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणाची कोणतीच चौकशी झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाचीही ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी यावेळी खासदार भावना गवळी यांनी केली आहे.
’विशेष सहाय्य विभागाचे उपसचिव यांच्याकडे पत्र’
नगरविकास विभागाचे उपसचिव सतिश मोघे यांनी गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभागाचे उपसचिव यांच्याकडे पत्र पाठवून पाटणी कॉम्प्लेक्समधील महाराष्ट फ्लॅट मालकी हक्क कायदा 1963, तसेच, रेरा संबंधित तक्रारीवर आपल्या विभागाकडून कारवाई होणे येग्य राहील या दृष्ठीने पत्र पाठवण्यात आले आहे.
’काँग-ेस व राष्ट्रवादी काँग-ेसच्या विरोधात निवडून आले पण अशी गोष्ट झाली नाही’.
सध्या आणीबाणी लावल्यासारखी वागणूक दिली जात असून, ही पद्धत योग्य नाही. जिल्ह्यातील काही नेत्यांनी हा खेळ मांडला आहे. असे प्रत्यक्ष नाव न घेता काही विरोधक असलेल्या स्थानिक नेत्यांकडे गवळी यांनी बोट दाखवले. खासदार म्हणून इतके वर्षे काम केले, काँग-ेस व राष्ट्रवादी काँग-ेसच्या विरोधात निवडून आले; परंतू अशी कुठलीही गोष्ट या 23 वर्षाच्या काळात झाली नाही. जी आता होत आहे, असेही खासदार गवळी म्हणाल्या आहेत.