राज्येकेंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड -19 प्रतिबंधक लस उपलब्धतेबाबत अद्ययावत माहिती
नवी दिल्ली,
देशभरात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्याला 21 जुन,2021 पासून सुरुवात झाली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करण्याच्या दृष्टीने लसींची अधिक उपलब्धता, लसींच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यात आली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा पुरवठा विनामूल्य करत आहे. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात,केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित 75म लस खरेदी करून या लसीचा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य ) पुरवठा करेल.
केंद्र सरकारद्वारे (विनामूल्य पुरवठा मार्गाने ) आणि थेट राज्यांकडून खरेदीच्या मार्गाने केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसीच्या एकूण 64.36 कोटींहून अधिक (64,36,13,160) मात्रांचा पुरवठा केला आहे. आणखी सुमारे 15 लाख (14,94,040) मात्रा पुरवठा होण्याच्या मार्गावर आहेत.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही कोविड प्रतिबंधक लसीच्या न वापरलेल्या 5.42 कोटींहून अधिक (5,42,30,546) मात्रा अजूनही शिल्लक असून लसीकरणासाठी त्या उपलब्ध आहेत.