दहीहंडी काय खुर्चीवर उभं राहून फोडायची का? राज ठाकरे

मुंबई

’लॉकडाऊन आवडे सरकारला, तर आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही का?’ . मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही जोरात दहीहंडी साजरी करा. जे होईल ते होईल, असं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्याची परवानगी दिली आहे.

हे घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात, तर आम्ही काय करायचं?, असं म्हणतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका देखील केली आहे. मंदिरं उघडली नाही तर मनसे घंटानाद आंदोलन करणार, असं देखील यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

हे घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात, तर आम्ही काय करायचं?. गर्दी कुठेही कमी झालेली नाही. त्यामुळे आम्ही दहीहंडी साजरी करणारचं. लॉकडाऊन आवडे सरकारला त्यामुळे निर्बंध कमी केलेच नाहीत.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता सरकारने दहीहंडीवर निर्बंध लादले. दहीहंडीवर यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे सरकारने दहीहंडी फोडण्याला परवानगी दिली नव्हती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र यावर आक्रमक पवित्रा घेतला होता. सोमवारी रात्री ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यात पोलिसांसमोरच दहीहंडी फोडली. यानंतर अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ठाणे फेरीवाला मुद्यावर राज ठाकरे

ठाण्यात अवैध फेरीवाल्यांची मुजोरीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. साहाय्यक महापालिका आयुक्त कल्पिता पिंपळे यांची तीन बोटं छाटली गेली आहेत. आरोपी पोलिसांकडून सुटला तर मनसेकडून मार खाईल, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

फेरीवाला सुटल्यानंतर आधी पोलिसांचा मार खाईल, त्यानंतर मनसेकडून त्याला इंगा दाखवला जाईल. आता अटक केली. त्यानंतर त्यांना जामीन मिळेल आणि ते बाहेर येतील. यांना ठेचले पाहिजे. अधिकार्‍याची बोट छाटली, याआधी अशी कोणाची हिम्मत झालेली नाही. भीती काय असेल तर ते जेलमधून बाहेर येतील, त्यावेळी त्यांना समजेल. भीती काय असते ती, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. यांची जेव्हा बोट छाटली जातील आणि त्याला जेवता येणार नाही, त्यावेळी त्याला समजेल, असा सज्जड दमच राज ठाकरे यांनी दिला आहे.

ठाण्यात फेरीवाल्यांची मुजोरी अधिकार्‍यांच्या जीवावर उठली. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला. हल्लेखोर फेरीवाला अमरजीत यादव याच्या या हल्ल्यात कल्पिता यांची तीन बोटं छाटली गेली आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!