तालिबानी म्हणतात, भारत आमचा शत्रू नाही; भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचेत

काबुल,

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध यापुढे कसे असणार याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात होते. दोन दिवसांपूर्वी एबीपी न्यूजने एका एक्स्क्लुझिव्ह बातमीत सांगितले होते की भारत सरकार अफगाणिस्तानच्या नवीन तालिबान राजवटीशी संपर्क साधेल. आता तालिबाननेही भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तालिबानचे नेते मौलवी झियाऊल हक्कमल यांनी म्हटलं की, भारत आमचा शत्रू नाही आणि आम्हाला भारताशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत असं तालिबानने एबीपी न्यूजशी खास बातचित करताना सांगितले.

यापूर्वीही तालिबानने असे संकेत दिले होते जेव्हा तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्तनिकजाई म्हणाले होते की भारत हा या क्षेत्रातील एक महत्त्वाचा देश आहे आणि आम्हाला भारतासोबत चांगले व्यापार आणि आर्थिक संबंध हवे आहेत.

एबीपी न्यूजवर मौलवी झियाऊल हक्कमल यांच्या वक्तव्यावरून आता हे स्पष्ट झाले आहे की, तालिबानच्या किमान एका मोठ्या आणि प्रभावशाली गटाला याची जाणीव आहे की भारताने अफगाणिस्तानात अनेक विकास कामे केली आहेत. कदाचित भारत हा एकमेव देश आहे जो अफगाणिस्तानमध्ये प्रामाणिकपणे हिताची कामे करत आहे.

अमेरिकन सरकार तालिबानला औपचारिक मान्यता देण्याच्या बाजूने नाही. डेमोक्रेटिक पक्षाचे वरिष्ठ सिनेटर ख्रिस मर्फी म्हणाले की अफगाणिस्तानमधील विरोधी शक्तींना मान्यता देणे ही चांगली कल्पना नाही. कारण ते प्रत्यक्षात देश चालवत नाहीत. मर्फी यांनी पुढे म्हटलं की, अमेरिका तालिबानला मान्यता देत नसेल तरीही तालिबानच्या एका गटाशी बोलले पाहिजे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!