शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 3 दिवसांत 5.76 लाख कोटींची वाढ
नवी दिल्ली,
मुंबई शेअर बाजाराने विक्रमी निर्देशांक नोंदविल्याने बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांची संपत्ती 247.30 कोटी रुपयांनी वाढली आहे. तर गेल्या तीन दिवसांमध्ये गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 5.76 लाख कोटींची वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजारात सलग तिसर्या दिवशी निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी 765.04 अंशाने वधारून 56,889.76 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 833.55 अंशाने वधारून 56,958.27 वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीने आज विक्रमी निर्देशांक नोंदविला.
गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 945.55 अंशाने वधारला. बाजाराचा निर्देशांक वाढल्याने शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे वाढून 2,47,30,108.97 कोटी रुपये झाले आहे. तर गुंतवणूकदारांची संपत्ती 5,76,600.66 कोटी रुपयांनी वाढली आहे.
मुंबई शेअर बाजाराने आजवरचा विक्रमी निर्देशांक नोंदविला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 765.04 अंशाने वधारून 56,889.76 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 225.85 अंशाने वधारून 16,931.05 स्थिरावला. मुंबई शेअर बाजारात सर्वाधिक एअरटेलचे 4 टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्याचबरोबर अॅक्सिस बँक, टाटा स्टील, टायटन, मारुती आणि बजाज फायनान्सचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. दुसरीकडे टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर घसरले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकाने दिवसाखेर पहिल्यांदाच 56 हजारांचा टप्पा ओलांडला.