पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलनं रचला इतिहास; रौप्य पदाकावर कोरलं नाव
टोक्यो
भारताच्या भविना पटेलनं टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. सुवर्णपदाचं स्वप्न अधुरं असलं तरी भविनानं रौप्य पदक कमावत इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भविना भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. दरम्यान, भविनाकडे सुवर्ण पदक कमावण्याची संधी होती. परंतु, अंतिम सामन्यात चीनच्या यिंगनं तिचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
19 मिनिटं चाललेल्या सामन्यात भविना पटेलनं चिनच्या वर्ल्ड नंबर वन यिंगला टक्कर दिली. पण यिंगनं सलग सेटमध्ये भविनाचा पराभव केला. यिंगनं पहिल्या सेटपासूनच भविनावर दबाव तयार केला होता. यिंगनं पहिला सेट 11-7 अशा फरकानं आपल्याबाजून वळवला. दुसर्या सेटमध्येही यिंगचं प्रदर्शन उत्तम राहिलं. तिनं दुसरा सेट 11-5 अशा फरकानं आपल्या नावे केला. तिसर्या सेटच्या सुरुवातीपासूनच भविना वापसी करण्याच्या प्रयत्नात होती. परंतु, यिंगनं तिसरा सेटही 11-6 अशा फरकानं जिंकत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.
असा होता भविनाचा पॅरालिम्पिकमधील प्रवास…
भविना पटेलचा टोकियो पॅरालिम्पिकमधील प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला. भविनानं आपल्या उत्तम खेळानं सर्वांच्याच मनात वेगळं स्थान निर्माण केलं. वर्ल्ड रॅकिंगमध्ये बाराव्या क्रमांकावर असणारी भविनानं अनेक दिग्गज खेळाडूंना मात दिली. प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये भविना पटेलनं आठव्या क्रमांकावरील खेळाडूला मात देत विजय मिळवला.
क्वॉर्टर फायनल्स आणि सेमीफायनल्समध्ये भविना पटेलनं कमाल केली. भविनानं क्वॉर्टर फायनल्समध्ये रियो पॅरालिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट आणि वर्ल्ड रॅकिंगमधील दुसर्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव केला. चीनची स्टार खेळाडू आणि वर्ल्ड रॅकिंगमधील तिसर्या क्रमांकावरील खेळाडूचाही भविनानं सेमी फायनल्समध्ये दारुन पराभव केला.
भविन पटेलनं सेमी फायनलमध्ये जागतिक तिसर्या क्रमांकाच्या खेळाडू असलेल्या मियोचा पराभव केला. भविननं हा सामना 3-2 (7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8) असा जिंकला आणि अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं होतं.