सिबीडीटीने विवाद से विश्वास कायद्याच्या कलम 3 अंतर्गत तारखेत केली वाढ

नवी दिल्ली,

प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास कायद्याच्या अधिनियम 2020 (यापुढे फविवाद से विश्वास कायदाङ्ग म्हणून संबोधला जाईल) च्या अंतर्गत घोषणा करणार्‍याने देय असलेली रक्कम विवाद से विश्वास कायद्याच्या कलम 3 अंतर्गत तक्त्यात नमूद केली आहे.

अलिकडेच 25 जून 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, देय रकम भरण्याची अखेरची तारीख (कोणत्याही अतिरिक्त रक्कमेशिवाय) 31 ऑॅगस्ट 2021 अशी अधिसूचित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त विवाद से विश्वास अधिनियमच्या अंतर्गत रक्कम (अतिरिक्त रकमेसह) भरण्याची अंतिम तारीख 31 ऑॅक्टोबर 2021 अशी अधिसूचित करण्यात आली आहे.

फॉर्म क्रमांक 3 जारी करताना आणि त्यात सुधारणा करताना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन, विवाद से विश्वास कायद्यांतर्गत घोषणा करणार्‍याने पैसे भरण्याची पूर्व अट ठेवण्यात आली आहे, ती रक्कम भरण्याची शेवटची तारीख (कोणत्याही अतिरिक्त रकमेशिवाय) वाढवून 30 सप्टेंबर 2021 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक अधिसूचना लवकरच जारी केली जाईल.

तथापि, हे स्पष्ट करण्यात आले आहे की विवाद से विश्वास अधिनियमांतर्गत (अतिरिक्त रकमेसह) रक्कम भरण्याची अंतिम तारीख बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे ती 31 ऑॅक्टोबर 2021 अशीच असेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!